Standup Comedian Mandar Bhide: 'स्टँडअप कॉमेडी' हा प्लॅटफॉर्म आता प्रचंड पसरला जात आहे.  बऱ्याच स्टँडअप कॉमेडियनचा चाहतावर्ग मोठा आहे. अलिकडेच समय रैना आणि प्रणित मोरे आपआपल्या शोमुळे वादात अडकले होते. या शोमध्ये बऱ्याचदा 'Below the belt'  विनोद केला जातो. काही जण या विनोदाचा निषेध करतात. तर, काही जण यावर कोणताही आक्षेप घेत नाहीत. समय रैना हा 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे आणि प्रणित मोरे '370 बिर्याणीच्या' प्रकरणामुळे वादात अडकला होता. सध्या स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर आणि 'Below the belt' विनोद असतात. असे शोज पाहून  कॉमेडीच्या नावाखाली मर्यादा ओलांडल्या जातात का?  असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, यावर स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांनी मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.   

Continues below advertisement

विनोदाच्या नावाखाली मर्यादा ओलांडल्या जातात का? (Comedian Mandar Bhide on Standup Comedy Show)

स्टँडअप कॉमेडियन  मंदार भिडे यांनी सौमित्र पोटेंच्या मित्र म्हणेला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना, 'आता ज्या पद्धतीची कॉमेडी सुरुये.. इन्स्टाग्राम, युट्यूबवर पाहायला मिळते.  Below the Belt, अश्लील, शिव्यांनी भरलेली कॉमेडी असते.  तुला या सगळ्याकडे बघून नेमकं काय वाटतं?',  या प्रश्नावर मंदार भिडेनं प्रतिक्रिया दिलं आहे. 'गेले सव्वा वर्ष मला स्वत:ला कळत नाहीये की, हे जे चाललंय, ते का चाललंय  आणि या गोष्टीला नेमकं नेव्हिगेट करायचं कसं?  गेल्या 2-3 वर्षांपासून मिर्जापूरसारखे वेब सिरीज जे चालतायेत, मला कळतच नाहीये की सुशिक्षित लोक हा कंटेट कन्झ्यूम का करतायेत?', असं मंदार भिडे म्हणाले. 

आजच्या ऑडियन्सच्या आवडीत बदल होऊ शकतो (Mandar Bhide on Comedy)

'आपण नेमकं कुठे चुकतोय? किंवा पुढे देखील असंच चालू राहणार का? हे कुणालाच माहिती नाहीये. आपण म्हणतो ना मोह, याला आपण पटकन आहारी जातो. पण प्रॉब्लेम असा आहे ना, तुम्ही जर ती एक गोष्ट आहारी जाऊन केली तर, आयुष्यभर तुम्ही त्या टाइपकास्टचे व्हाल.  अरे  हा चांगला वाटत होता, हाही तसाच निघाला', असं मंदार भिडे म्हणाले. 'मी जेव्हा 22 वर्षांचा होतो तेव्हा कदाचित अशा टाइपचं कंटेट मलाही आवडत होतं. जस जसं माझं वय वाढत गेलं. तस तसं माझ्या आवडीत बदल होत गेला. चांगल्या गोष्टींची आवड तयार झाली. आज ज्या कॉमेडीवर ऑडियन्स तयार होतेय, कदाचित त्यांच्या आवडीत पुढे जाऊन बदल होऊ शकतो', असंही मंदार भिडे म्हणाले. 

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

समय रैनाकडून तारीख जाहीर; 'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन 2चा पहिला एपिसोड कधी होणार रिलीज? आलिया भट्ट अन्.. कोणकोणते पाहुणे दिसणार