मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्यांमध्ये संदीप सिंह हे नाव सातत्याने समोर येऊ लागलं. सुशांत गेल्याचं कळल्यानंतर सुशांत तातडीने बांद्र्याच्या त्याच्या घरी हजर झाला. अनेकांनी आपल्या जबाबात ते स्पष्ट करून सांगितलं आहेच. पण आता सीबीआयच्या चौकशीत मात्र संदीप सिंहची गोची झालेली दिसू लागली आहे. सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर संदीप देऊ शकलेला नाही.


सध्या संदीपची सीबीआयसमोर चौकशी सुरू आहे. सुशांतच्या मृत्यूची आत्ता तीन पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. एक सीबीआय, एनसीबी आणि ईडी अशा पातळ्यांवर ही चौकशी सुरू आहे. सध्या सीबीआय एम्सच्या डॉक्टरांच्या पथकासह आपलं काम करते आहे. यात त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा सुशांतच्या घरी त्याच दिवसाचा सीन रिक्रिएट केला होता. त्यात एम्स डॉक्टरांचं पथक सुशांतच्या बिल्डिंगच्या गच्चीवर दोन तास होतं.


त्यानंतर संदीपला सीबीआयने चौकशीला बोलावलं. त्यांनी संदीपसमोर ठेवलेले प्रश्न होते ते असे, सुशांत गेल्याची बातमी त्याला कुणी दिली? सुशांत गेल्याचं कळल्यानंतर संदीप तिथे पोचला असं असेल तर सुशांतचं आधार कार्ड, पॅन कार्ड त्याला कुणी दिलं? सुशांतचा मृतदेह कूपर हॉस्पिटलला न्यायचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून घेतला? हा मृतदेह हॉस्पिटलला नेताना सुशांतच्या घरच्यांना घरी का ठेवण्यात आलं होतं? मृतदेह ज्या रुग्णवाहिकेतून नेला त्याचं पेमेंट लगेच झालं होतं तर त्या गाडीचा ड्रायव्हर आणि संदीपमध्ये काय संभाषण झालं? असे काही प्रश्न सीबीआयने संदीपला विचारले ज्याचं उत्तर संदीपला देता आलेलं नाही.


या चौकशीवेळी संदीपला आणखीही एक गोष्ट लिहून द्याला सांगितली गेली. संदीप जर सुशांतचा खूप चांगला मित्र असल्याचा दावा करतो तर त्यावेळी आजुबाजूला कोण कोण हजर होते याची यादी सीबीआयने संदीपला करायला सांगितली. त्यानंतर संदीपने ही यादी करायला वेळ मागिताल. तर सीबीआयने त्याला पेन आणि डायरीही दिली. त्यानंतर त्याला ही यादी करायला सांगितली. पण त्याला ती यादीही करता आली नसल्याचं कळतं.


या सगळ्या प्रकारामुळे सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं सीबीआयच्या अंतर्गत वर्तुळात बोललं जाऊ लागलं आहे. हे हल्लेखोर गच्चीवरून आले होते का, सुशांतच्या बिल्डिंगला मागूनही एक फाटक आहे, तिथून ते आले होते का अशा अनेक बाबींचा तपास सध्या सीबीआयची टीम करते आहे. पण संदीप सिंह हा या सगळ्या प्रकरणातला महत्वाचा पुरावा असणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :