Sridevi : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अधिक सुंदर दिसण्यासाठी आपल्या शरीरावर, विशेषतः चेहऱ्यावर, विविध प्रयोग केले आहेत. पण तुम्ही कल्पना करू शकता का, की अशी एक अभिनेत्री (Sridevi) होती जिने तब्बल 29 शस्त्रक्रिया केल्या होत्या. ती अभिनेत्री (Sridevi) बॉलिवूडमधील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिने 269 सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र, वयाच्या वयाच्या 54 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला होता. (Sridevi)
ही अभिनेत्रीला तुम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे ओळखता. तिने केवळ आपल्या सौंदर्याला टिकवण्यासाठी 29 वेळा शस्त्रक्रिया केल्या होत्या. तिचा पती एक प्रसिद्ध निर्माता आहे आणि त्यांची मुलगीही आज अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली आहे. अभिनेता आणि अभिनेत्री शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. बाहेरून पाहणाऱ्यांना त्यांच्या आयुष्याकडे बघून वाटते की ते एक आलिशान जीवन जगतात, पण त्यामागे त्यांची मेहनत असते, त्याग आणि असामान्य निर्णय घेतलेले असतात.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्रीदेवी आहे. श्रीदेवीने केवळ 2-4 नव्हे, तर तब्बल 29 शस्त्रक्रिया केल्या होत्या. 20 वर्षांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या श्रीदेवीचा जन्म तमिळनाडूमधील शिवकाशी जवळील एका गावात झाला होता.
काही चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे की, भारतीय सिनेमामध्ये श्रीदेवी यांच्यासारखी दुसरी कुठलीही अभिनेत्री लोकप्रिय झालेली नाही. तरुणपणी त्यांचा चेहरा आणि सौंदर्य वेगळंच आकर्षण घेऊन आलं होतं. परंतु, त्याच सौंदर्याला टिकवण्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या 29 शस्त्रक्रिया केल्याची चर्चा आहे. या प्रक्रियांमुळे त्यांना अनेक गोष्टींपासून दूर राहावे लागत असे.
श्रीदेवीने सौंदर्य कायम ठेवण्यासाठी लेझर स्किन सर्जरी, सिलिकॉन ब्रेस्ट ट्रीटमेंट, फेसलिफ्ट अशा विविध उपचारांचा समावेश केला होता. नैसर्गिक सौंदर्य जरी खूप उठून दिसत नसलं तरी या सर्जरींमुळे त्यांच्या सौंदर्यात खूप मोठा बदल दिसून आला होता.
असं म्हणतात की, त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ओठांची शस्त्रक्रियाही झाली होती. भारतात इतक्या शस्त्रक्रिया करून सौंदर्य टिकवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत श्रीदेवी सर्वांत आघाडीवर होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 269 चित्रपटांमध्ये काम केलं. विविध भाषांतील आणि अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक झालं. पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांचं आयुष्य बोनी कपूर यांच्यासोबत जोडलं गेलं.
श्रीदेवी यांचं निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी झालं. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या अभिनयाची परंपरा आता त्यांची मुलगी जान्हवी कपूर पुढे चालवत आहे. जान्हवी फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर दक्षिण भारतातील सिनेसृष्टीतही वेगाने यशाच्या शिखरावर पोहोचत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
चान्स मारण्यासाठी ब्लाऊजचं माप घेतोय का? गौतमी पाटीलचा खडा सवाल, अजित कुमारला घाम फुटला! Video
VIDEO : गौतमी पाटील आणि आण्णा नाईकांची जुगलबंदी, बाई वाड्यावर गाण्यावर धमाल मस्ती
