Squid Game Season 3 : ओटीटी जगतात खळबळ माजवणारी कोरियन वेब सीरिज स्क्विड गेमने सर्वांनाच वेड लावलं. अलिकडे स्क्विड गेमचा दुसरा सीझन रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता लवकरच निर्माचे स्क्विड गेम वेब सीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत. स्क्विड गेम सीझन 3 ची घोषणा झाली आहे. निर्मात्यांनी स्क्विड गेम 3 ची रिलीज डेट जाहीर केली आहे. आता हा नवा सीझन नेटफ्लिक्सवर केव्हापासून स्ट्रिम होईल ते जाणून घ्या.


स्क्वीड गेमच्या तिसऱ्या सीझनची घोषणा


नेटफ्लिक्सने स्क्विड गेमच्या आगामी तिसरा सीझन प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर केली आहे. नेटफ्लिक्स चीफ कंटेट ऑफिसर बेला बजारिया यांनी स्क्विड गेम सीझन 3 ची रिलीज डेट सांगितली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, नव्या वर्षात प्रेक्षकांना स्क्विड गेम 3 पाहता येणार आहे. बेला बजारिया यांनी सांगितलं की, 700 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी ही सीरीज पाहिली आहे. यामध्ये फक्त एखादी गोष्ट दाखवून चालणार नाही. यामध्ये आम्हाला टीव्ही सीरिज आणि चित्रपटांपासून गेमपर्यंत सर्वच बाबतीत उत्कृष्ट व्हर्जन बनवावं लागणार आहे.


स्क्वीड गेम 3 'या' दिवशी रिलीज होणार


नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर स्क्विड गेम सीझन 3 चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यासोबतच नवा सीझन नेटफ्लिक्सवर केव्हापासून स्ट्रीम होईल, ते सांगितलं आहे. स्क्विड गेम सीझन 3 आता 27 जून 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझन फायनल सीझन असणार आहे, कारण पोस्टरवर 'Prepare For Final Game' म्हणजेच 'अंतिम खेळासाठी तयार राहा' अशी टॅगलाईन लिहिली आहे. 


ह्वांग डोंग-ह्युक यांनी आधी केली होती घोषणा 


'स्क्विड गेम 3' चे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता ह्वांग डोंग-ह्युक यांनी एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, ' स्क्विड गेम 3 ची बातमी शेअर करण्यासाठी मी हे पत्र लिहिण्यास खूप उत्सुक आहे. गि-हुन आणि फ्रंट मॅन या दोन जगांमधील भयंकर संघर्ष हा मालिकेचा सीझन 3 संपेपर्यंत सुरू राहील, जो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी सादर केला जाईल'.


स्क्विड गेम 3 साठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला


ह्वांग यांनी पुढे लिहिलं की, 'या कथेच्या शेवटी नवीन स्क्विड गेम तयार करण्यासाठी लावलेले बीज वाढताना आणि ते फळ घेत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. आम्ही तुमच्यासाठी आणखी एक मनोरंजक मालिका आणण्याचा प्रयत्न करू'. स्क्विड गेम वेब सीरीजचे दोन सीझन धमाकेदार ठरल्यानंतर आता तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Priyanka Chopra : प्रियंका चोप्रा सर्वात महागडी भारतीय अभिनेत्री, महेश बाबूसोबतच्या आगामी चित्रपटासाठीची फी ऐकून बसेल धक्का