Splitsvilla 7 Contestant And Mr India Winner Mayank Pawar Dies: टेलिव्हिजनवरच्या (Television News) सर्वाधिक गाजलेल्या रिअॅलिटी शोपैकी (Reality Show) एक असलेल्या 'स्प्लिट्सव्हिला 7'मध्ये (Splitsvilla 7) दिसलेला मयंक पवार (Mayank Pawar) याचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी मयंकनं जगाचा निरोप घेतला. मयंकच्या अकाली एग्झिटनं सर्वांना धक्का दिला आहे. मयंक पवार 'स्प्लिट्सव्हिला 7'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला. एवढंच नाहीतर मयंक 'मिस्टर इंडिया' देखील होता. त्यानं शोमध्ये सर्वांची मनं जिंकून घेतलेली. मयंकच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. मयंकच्या मृत्यूचं कारण अद्याप कुणालाच समजू शकलेलं नाही. दरम्यान, मयंकच्या टीमनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन ही दःखद बातमी दिली. 

Continues below advertisement

मयंकच्या निधनाची बातमी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. त्यात त्याचा फोटो आणि शोकसभेची तारीख आहे. पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान... मयंक पवार नेहमीच आपल्या हृदयात राहील. कृपया प्रार्थनेत सामील व्हा आणि त्यांची आठवण ठेवा... ओम शांती..." यासोबतच शोकसभेची माहितीही देण्यात आली आहे, ज्यामध्ये असं लिहिलंय की, "आम्हाला कळवताना खूप दुःख होतंय की, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर, फिटनेस आयकॉन आणि 'स्प्लिट्सव्हिला 7'मध्ये दिसलेला 6 वेळा मिस्टर इंडिया मयंक पवार याचं निधन झालंय...'  

मयंक 'स्प्लिट्सव्हिला 7'मधून बाहेर पडल्यानंतर सनी लिओनीला अश्रु अनावर झालेले

'स्प्लिट्सव्हिला 7'मधून मयंक बाहेर पडला, तेव्हा सनी लिओनी रडली. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत राणा प्रताप बागेतील संगम पार्कजवळील वाल्मिकी मंदिरात मयंक पवार याच्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. मयंक हा रिअॅलिटी शोच्या जगातील एक प्रसिद्ध नाव होतं. 'स्प्लिट्सव्हिला 7'मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली. मयंक शोमधून बाहेर पडल्यावर चाहते खूप दुःखी झालेले. त्यावेळी शोची होस्ट सनी लिओनीनंही भावूक होऊन मयंकला मिठी मारलेली आणि रडलेली.

मयंक पवार कोण? 

मयंक पवार याचा जन्म 1 जानेवारी 1989 रोजी झाला. फिटनेस जगतात मयंक खूप प्रसिद्ध होता. त्याच्या फिटनेस प्रवासानं आणि शरीरसौष्ठवानं लाखो लोकांना प्रेरणा दिली. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसला. 23 फेब्रुवारी रोजी मयंकचं निधन झालं, पण अद्याप त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. मयंक पवार यानं सात वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला असला तरी, तो मिस्टर एशिया देखील होता.