Special Ops 8 Episode Spy Thriller Series: ओटीटीच्या (OTT Released) दुनियेत दरवर्षी अनेक स्पाय-थ्रिलर सीरिज (Spy Thriller Series) प्रदर्शित होतात, पण काही मोजक्याच सीरिज (Web Series) आपलं दमदार कथानक आणि सस्पेन्समुळे प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडतात. अशीच एक सीरिज म्हणजे, स्पेशल ऑप्स (Special Ops), जिनं भारतीय डिजिटल स्पेसमध्ये (Indian Digital Space) हेरगिरी आणि अॅक्शनचा नवा मापदंड तयार केलाय. ही कथा एखाद्या सामान्य पोलीस तपासाची नसून, अनेक वर्ष गुप्तपणे चाललेल्या एका मिशनची आहे. या सीरिजमधील प्रत्येक भाग रंजक असून कथानक झपाट्यानं पुढे सरकत राहतं. त्यामुळे ही सीरिज खिळवून ठेवते. 

Continues below advertisement

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी स्पाय-थ्रिलर सीरिज (Spy Thriller Web Series)

2020 मध्ये, जेव्हा कोरनामुळे संपूर्ण जग आपापल्या घरांमध्येच सीमित झालेलं, तेव्हा दिग्दर्शक नीरज पांडे यांनी एक अशी उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांसमोर सादर केली, जिनं 'स्पाय-थ्रिलर' (गुप्तहेर-कथा) प्रेमींची मनं जिंकून घेतली. अर्थातच, आपण इथे 'स्पेशल ऑप्स' (Special Ops) या मालिकेबद्दल बोलत आहोत. या मालिकेचं मुख्य आकर्षण तिच्या कथानकातील एका विशिष्ट धाग्यामध्ये दडलंय. तो धागा थेट 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी जोडलेला आहे. ही संपूर्ण कथा 'RAW' एजंट हिम्मत सिंह यांच्याभोवती गुंफलेली आहे, गेल्या 19 वर्षांपासून ते एका अशा दहशतवादी सूत्रधाराचा शोध घेत आहेत, ज्याचं अस्तित्व सरकारी दस्तऐवजांमध्ये केवळ एक थिअरी म्हणूनच मानलं जातं. विविध देशांमध्ये विखुरलेले धागेदोरे आणि पुरावे एकत्र जोडून, ​​भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणाऱ्या त्या अत्यंत मायावी आणि शोध घेण्यास कठीण अशा व्यक्तीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न हिम्मत सिंह आणि त्यांच्या पाच गुप्तहेरांच्या पथकाकडून केला जातोय.

दमदार कलाकार आणि iMDB रेटिंग (Special Ops Star Cast)

'स्पेशल ऑप्स' सीरिजच्या यशामागे त्यातील दमदार कलाकारांचा मोठा वाटा आहे. केके मेनन यांनी हिम्मत सिंहच्या भूमिकेत दाखवलेला स्थिरपणा आणि बुद्धिमत्तेचा संगम प्रेक्षकांना खूप भावतो. त्यांच्या सोबत करण टॅकर, विनय पाठक, मेहर विज आणि सायामी खेर यांसारख्या कलाकारांनीही उत्कृष्ट अभिनय केला आहे. याचमुळे या सिरीजला आयएमडीबीवर 8.6/10 अशी शानदार रेटिंग मिळाली असून, ती भारतातील सर्वोत्तम वेब सीरिजपैकी एक मानली जाते.

Continues below advertisement

कुठे पाहू शकता सीरिज? (Special Ops On OTT)

जर तुम्हाला सस्पेन्स आणि इंटेलिजन्सनं भरलेला ड्रामा पाहायचा असेल, तर 'स्पेशल ऑप्स'चे सर्व 8 भाग JioHotstar वर उपलब्ध आहेत. ही सीरिज हॉटस्टारवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिजपैकी एक आहे. विशेष म्हणजे, या सीरिजचे 'स्पेशल ऑप्स 1.5' आणि 'स्पेशल ऑप्स 2' असे आणखी दोन सीझनही प्रदर्शित झालेत. या दोन्ही सीझनलाही प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्यांचं कथानकही शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12: बॉक्स ऑफिस 'धुरंधर 2'च्या ताब्यात; KGF 2 च्या रेकॉर्ड्सचा अक्षरशः चक्काचूर, भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं