Blockbuster Movie: 70 लाखांच्या 'या' फिल्मचा 460 दिवस थिएटर्समध्ये धुमाकूळ; कमावलेले 75 कोटी, तुम्ही पाहिलीय?
Blockbuster Movie: आजकाल बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमे प्रचंड लोकप्रिय आहेत. चाहते या सिनेमांची आतुरतेनं वाट पाहत असतात. अशाच एका कन्नड चित्रपटानं त्याच्या बजेटपेक्षा 100 पट जास्त कमाई केली.

Blockbuster Movie: बॉलिवूड (Bollywood News) सिनेमा असो वा साऊथचा (South Movie), कित्येक बिग बजेट सिनेमे (Big Budget Movie) रिलीज होत असतात. या सिनेमांमध्ये बऱ्याचदा उत्कृष्ट कथांव्यतिरिक्त सर्वकाही पाहायला मिळतं. बिग बजेटच्या नावाखाली सिनेमात काय दाखवलं जाईल हे सांगता येत नाही. एवढे पैसे ओतूनही अजिबात गॅरंटी नसते की, फिल्म बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही... पण काही कमी बजेटचे सिनेमे बॉक्सऑफिसवर एवढा धुमाकूळ घालतात की, दिग्गजांच्या बिग बजेट सिनेमांनाही टक्कर देतात. कोणत्याही स्टारशिवाय, ते केवळ त्यांच्या कथेच्या बळावर कित्येकांची मनं जिंकतात. 2006 मध्ये, एक कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यानं त्याच्या बजेटपेक्षा तब्बल 100 पट कमाई केली. याशिवाय, तो चित्रपट एका वर्षापेक्षा जास्त काळ थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत होता.
त्यानं 460 दिवस थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला... (South Movie Mungaru Male)
आम्ही ज्या कन्नड चित्रपटाबद्दल सांगत आहोत तो म्हणजे, 'मुंगारू मले' (Mungaru Male). 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात कोणताही मोठा स्टार नव्हता. गणेश आणि पूजा गांधी यांनी प्रमुख भूमिका केलेल्या. ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्या सर्वांनी, त्याचं भरभरुन कौतुक केलं. बंगळुरू पीव्हीआरमध्ये 460 दिवस चालल्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये वर्ष पूर्ण करणारा हा पहिला चित्रपट ठरला.
View this post on Instagram
फक्त काही लाखांत तयार झालेला सिनेमा, पण कमाई (Mungaru Male Box Office Collection)
साऊथ सिनेमा 'मुंगारू मले'बाबत बोलायचं झालं तर, ही फिल्म केवळ 70 लाखांच्या बजेटमध्ये तयार झालेली. ही पहिली कन्नड फिल्म होती, जिनं वर्ल्डवाईड 50 कोटींहून अधिक कमाई केलेली. फिल्मनं एकूण 75 कोटींचं वर्ल्डवाईट कलेक्शन केलेलं. ज्यामध्ये 57 कोटी तर फिल्मनं कर्नाटकात कमावलेले. दरम्यान, 'मुंगारू मले'चा सीक्वलही आलेला. हा सीक्वल 2016 रिलीज झालेला, पण आपल्या पहिल्या पार्टसारखा तो धुमाकूळ घालू शकला नाही. 'मुंगारू मले'नं तब्बल 10 वर्ष बॉक्स ऑफिसचा ताबा स्वतःकडे ठेवलेला. केजीएफ 1 नं या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला. म्हणजेच, 'मुंगारू मले'चा रेकॉर्ड मोडायला इंडस्ट्रीला तब्बल बारा वर्ष लागली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
















