South Movie: ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या वेळी या चित्रपटाने चाहत्यांवर आपली जादू केली.या चित्रपटाने 6 दिवसांत जगभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटातील अक्शन आणि थ्रिलर सीन्स प्रचंड  प्रभावी आहेत. यापूर्वी 2022 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. कांतारा चित्रपट ऑल टाईम ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाच्या थराराने चाहत्यांना खिळवून ठेवले. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्या चित्रपटात अ ॅक्शन आणि थ्रिलमध्ये कांताराला मागे टाकण्याची ताकद आहे.

Continues below advertisement

Vada Chennai: धनुषचा वाडा चेन्नई पाहिला आहे का? 

या चित्रपटाचे नाव 'वाडा चेन्नई' असे आहे. या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. आयएमडीबी रेटिंगच्या बाबतीतही हा चित्रपट कांताराच्याही पुढे आहे. कांताराचे रेटिंग 8.2 होते. त्याच वेळी, वाडा चेन्नईला 8.4 रेटिंग मिळाले आहे. थ्रिलच्या बाबतीत, हा चित्रपट आपल्याला पूर्णपणे खिळवून ठेवतो. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक थोड्या वेळासाठी  कांतारालाही विसरेल. हा चित्रपट अंगावर  काटा आणतो.

ओटीटीवर वाडा चेन्नई कोठे पाहू शकतो?

हा चित्रपट अ ॅमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. अ ॅमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनसह तुम्ही  हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेत्रीमारन यांनी केले आहे. या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ऐश्वर्या राजेश, डॅनियल बालाजी, किशोर आणि एंड्रिया जेरेमिया यांच्यासारखे स्टार्स आहेत.प्रेक्षकांना या चित्रपटात सगळ्यांचा अभिनय आवडला होता.'वाडा चेन्नई' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. धनुषच्या चित्रपटाला पॉजिटिव वर्डऑफ माउथचा खूप फायदा झाला. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुकही केले होते. धनुषचा त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला.

Continues below advertisement

कांतारा चॅप्टर 1'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं पहिल्या दिवशी 61.85 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 46 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी सकाळी 10:15 वाजेपर्यंत, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं 53.82 कोटींची कमाई केली होती, ज्यामुळे एकूण कमाई 161.67 कोटी झाली.