Korean drama actor Lee Sang-bo Death News: मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे. साऊथ कोरियन अभिनेता ली सांग - बो याचं निधन झालं आहे . 44 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत चित्रपट तसेच टिव्ही मालिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्योंगटेक येथील अभिनेत्याच्या घरात गुरुवारी मृतदेह सापडला. अभिनेत्याचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर कोरिया मॅनेजमेंट ग्रुप (केएमजी)नं एक निवेदन जारी करत म्हटलं की, 'आम्ही अभिनेत्याच्या निधनाची बातमी पाहिली असून, सध्या परिस्थितीत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे'. दरम्यान, ली सांग - बो या अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ली सांग - बो या अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते तसेच कलाकारांनी शोक व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याच्या एका चाहत्याने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये श्रध्दांजली वाहिली आहे. त्यानं एक्सवर लिहिलं की, 'काही वर्षांपूर्वी अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. यानंतर एका रस्ते अपघातात अभिनेत्याची आई आणि बहिणीचेही निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून डिप्रेशनवर औषधोपचार घेत होते', अशी माहिती चाहत्याने दिली.
काही वर्षांपूर्वी अभिनेता ली सांग - बो ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. त्याच्यावर अवैध ड्रग्ज वापरल्याचा आरोप होता. 2022 साली त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. अॅक्टरने ड्रग्जचे सेवन केले नव्हते, असे तपासातून समोर आले. डिप्रेशनसाठी अभिनेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, औषधोपचार घेत होता.
ली सांग - बो अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2006 साली रिलीज झालेल्या 'इनव्हिजिबल मॅन चोई जंग सू' या कार्यक्रमातून केली. यानंतर अभिनेत्याने 'गोल्डन एरा ऑफ डॉटर्स इन लॉ', 'बॅड लव्ह', 'प्राइव्हेट लाइव्हस', 'रुगल' यांसह अनेक शोमध्ये काम केलं. दरम्यान, अभिनेत्याच्या दु: खद निधनानंतर चाहत्यांमध्ये तसेच मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'मला ती सोडून गेली..गुलीगत धोका'; सुरज चव्हाणला कुणी दिला धोका? मुलाखतीत सगळंच सांगितलं
