South Cinema : दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशचा उपमुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडत आहे. पण त्याआधीच, चित्रपटसृष्टी आणि राजकारणात त्यांचं नाव सिनेक्षेत्रात तुफान चर्चेत होतं. ‘पॉवर स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवन कल्याण यांना दोनदा पराभव स्वीकारावा लागला. मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांनी इतिहास घडवला. मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य तितकं सुखावह नव्हतं. सध्या ते आपल्या तिसऱ्या पत्नी, रशियन मॉडेल अन्ना लेझनेवा हिच्यासोबत राहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांची पहिली पत्नी कोण होती आणि गेल्या 16 वर्षांपासून ती कुठे आहे?

पवन कल्याण 1996 मध्ये सिनेसृष्टीत आले होते. त्यापूर्वी पवन विशाखापट्टणम येथील सत्यानंद अ‍ॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत होते. त्याच वेळी, विशाखापट्टणममधील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी नंदिनी हिच्याशी त्यांची भेट झाली. 1997 मध्ये पवन 26 वर्षांचे होते, तर नंदिनी 19 वर्षांची होती. त्यांच्या कुटुंबांनी हैदराबादमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह लावून दिला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण दोन वर्षांतच त्यांच्या नात्यात भांडणं सुरू झाली आणि त्यांनी एकत्र राहणं बंद केलं.

2001 पर्यंत पवन आपल्या सहकलाकार रेणु देसाईसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यामुळे नंदिनी आणखीनच दूर गेली. नंदिनीने आरोप केला की पवनने तिला सोडून दिलं, तर पवनचा दावा होता की नंदिनीच घर सोडून गेली होती. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, पण खरी कहाणी इथूनच सुरू झाली. नंदिनीने  2007 मध्ये दाखल केलेला खटला त्या काळात चर्चेचा विषय ठरला होता. तिने आरोप केला की पवनने तिला घटस्फोट न देता रेणु देसाईसोबत गुपचूप लग्न केलं आहे आणि त्याच्यावर “द्विविवाह” (bigamy) चा गुन्हा दाखल केला. पवनच्या वकिलांनी युक्तिवाद केला की ते लग्न नव्हतं, फक्त लिव-इन रिलेशनशिप होतं. पुराव्यांच्या अभावामुळे कोर्टाने पवनला क्लिन चिट दिली. पण काही दिवसांनी पवनने स्वतःच नंदिनीपासून घटस्फोटाची मागणी केली.

काही महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर, अखेर ऑगस्ट 2008 मध्ये त्यांचा विवाह अधिकृतरीत्या संपुष्टात आला. या सेटलमेंटअंतर्गत पवनने नंदिनीला एकदाच 5 कोटी रुपये दिले. हा खटला पवनच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात चर्चित मुद्द्यांपैकी एक ठरला.

आता नंदिनी काय करते? घटस्फोटानंतर नंदिनी पूर्णपणे लाईमलाइटपासून दूर झाली. नंतर ती अमेरिकेत गेली आणि तिथे एका एनआरआय डॉक्टरशी लग्न केलं. तिने आपलं नावदेखील बदलून ‘जाह्नवी’ ठेवलं. मागील 16 वर्षांपासून ती पूर्णतः माध्यमांपासून दूर राहत आहे आणि स्वतःची प्रायव्हसी जपते आहे. पवनची दुसरी पत्नी रेणु देसाई (जी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते) यांच्या उलट, नंदिनीने प्रसिद्धीपासून पूर्ण दुरावा ठेवला आहे.

2009 मध्ये पवनने रेणु देसाईशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत – आद्या आणि अकीरा. पण 2012 मध्ये हे नातंही घटस्फोटात संपलं. त्यानंतर 2013 मध्ये पवनने रशियन मॉडेल अन्ना लेझनेवा हिच्याशी तिसरं लग्न केलं. आता त्यांना देखील दोन मुलं आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मनोज बाजपेयी आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र येणार, सत्यानंतर आता हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार