कोट्यावधींचं मानधन घेतो; संपत्तीचा आकडाही मोठा; तरीही प्रभासला अभिनेत्रीशी लग्न करता येईना; धक्कादायक खुलासा
Prabhas Marriage : कोट्यावधींचं मानधन घेतो; संपत्तीचा आकडाही मोठा; तरीही प्रभासला अभिनेत्रीशी लग्न करता येईना; धक्कादायक खुलासा

Prabhas Marriage : सुपरस्टार प्रभासचे वय आता 45 झाले आहे, पण अजूनही त्यांनी लग्न केलेले नाही. तो अजूनही सिंगल आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रभासच्या लग्नाविषयी जोरदार चर्चा रंगल्या आहेत. देशातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक असूनही, ते म्हणावं तसं लग्न करू शकलेले नाहीत. प्रभासचे चाहते कोट्यवधींच्या संख्येत आहेत. मुलं असोत की मुली, त्यांना एकदा तरी प्रभासला पाहण्याची ओढ असते. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं, पण अनुष्का शेट्टीसोबतची त्याची जोड विशेष गाजली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे – हे दोघं लग्न का करत नाहीयेत?
प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या लग्नाच्या अफवा अनेक वेळा ऐकायला मिळाल्या आहेत. असंही म्हटलं जातं की त्यांचं सीक्रेट अफेअर चालू आहे आणि काही महिन्यांत ते लग्न करू शकतात. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशातच एका इंग्रजी मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
या बातमीनुसार, प्रभास आणि अनुष्का एकमेकांना पसंत करतात, पण एका खास कारणामुळे त्यांचं लग्न होऊ शकलेलं नाही. प्रभास आणि अनुष्काच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांची संमती होती, पण त्यांच्या कुंडल्या जुळल्या नाहीत, म्हणून लग्नाच्या तयारीला ब्रेक लागला आणि दोघं वेगळे झाले.
असंही म्हटलं जातं की, जर कुंडल्या जुळल्या नाहीत तर त्यांनी सिंगलच राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून प्रभासचे चाहते थोडे नाराज झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आजच्या काळात कुंडल्यांवर इतकं अवलंबून राहणं गरजेचं नाही, जर अनुष्का आणि प्रभास लग्न करतात तर त्यांची जोडी सर्वोत्तम वाटेल.
प्रभासच्या लग्नाबाबत आणि त्याच्या आवडीच्या मुलीबद्दल अभिनेता-निर्माता कृष्णम राजू यांची पत्नी श्यामला देवी यांनी यापूर्वी काही टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं, “फक्त तुम्हीच नाही, आम्हीही आणि सगळं जग प्रभासच्या लग्नाची वाट पाहत आहे.”
श्यामला देवी पुढे म्हणाल्या, “ईश्वराने प्रत्येक स्त्री आणि पुरुषासाठी एक जोडी बनवलेली असते, त्यामुळे योग्य वेळ येईल. वेळ आल्यावर सगळं काही होईल आणि तुम्हा सर्वांनाही आनंद होईल.” त्यांनी प्रभासच्या आवडीनुसार मुलीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि वागणुकीवरही भाष्य केलं.
त्या म्हणाल्या, “आमचं मोठं कुटुंब आहे, आणि प्रभासला अशी मुलगी आवडेल जी सर्वांमध्ये मिळून-मिसळून राहिल. प्रभासला असे लोक आवडत नाहीत जे सतत टीका करतात किंवा नकारात्मक बोलतात.” काहीही असो, प्रभासचं लग्न हा टॉलीवूडसाठी एक 'मिलियन डॉलर'चा प्रश्न बनला आहे.
कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं, तर प्रभास अखेरचा ‘कल्कि 2898 ए.डी.’ या चित्रपटात दिसला होता. आता तो ‘द राजा साब’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























