South Cinema : जपानमध्ये तमिळ चित्रपटांना नेहमीच एक वेगळं स्थान मिळालं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट Muthu. या चित्रपटानंतर रजनीकांत यांची जपानमध्ये मोठी फॅन फॉलोइंग तयार झाली. (South Cinema) रजनीकांत यांची केवळ भारतातच नाही तर जगभरातही अफाट लोकप्रियता मिळाली. थलैवाचे चाहते प्रत्येक ठिकाणी दिसतात. त्यांच्या चित्रपटांना देशांतर्गत तसेच परदेशातही नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. (South Cinema) रजनीकांत यांच्या चित्रपटांना जपानमध्ये कायम चांगला प्रतिसाद मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत – मुथु, दरबार, एंथिरन ही त्यापैकी काही. (South Cinema)

याच परंपरेत गेल्या वर्षी दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांच्या दिग्दर्शनाखाली रजनीकांत यांचा वेट्टैयन हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट लायका प्रॉडक्शन्सकडून तयार करण्यात आला होता. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अमिताभ बच्चन, मंजू वारियर, तुषारा विजय, राणा डग्गुबाती, फहद फासिल, ऋतिका सिंग, किशोर, असल कोलार यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. महत्वाचे सामाजिक मुद्दे मांडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. गेल्या आठवड्यात वेट्टैयन हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला. भारतामधील PVR-INOX प्रमाणेच जपानमधील नामांकित मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली आणि फक्त एका आठवड्यात नंबर 1 स्थान पटकावले.

यामध्ये रजनीकांत आणि फहद फासिल यांच्या भूमिका जपानी प्रेक्षकांना विशेष आवडल्या. वेट्टैयन हा 2024 चा तमिळ अॅक्शन-ड्रामा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल यांनी केले आहे आणि निर्मिती लायका प्रॉडक्शन्सचे सुभास्करन अलिराजा यांनी केले आहे. या चित्रपटात रजनीकांत एस. पी. अथियानची भूमिका साकारत आहेत, तर अमिताभ बच्चन न्यायप्रिय न्यायाधीश सत्यदेवच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच फहाद फासिल, राणा डग्गुबाती, मंजू वारियर आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: 'बॉम्बे' नाही, 'मुंबई' म्हणा...; कॉमेडियन कपिल शर्माला मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा, घडलंय काय?

Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: 'जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरबाबत लेकाचा खळबळजनक खुलासा