सौंदर्य असं की भल्याभल्यांना भुरळ पडावी, अनेक सुपरस्टार सोबत सिनेमे; पण 21 व्या वर्षी मृत्यू झाल्यानं सिनेसृष्टी हळहळली होती
South cinema monal actress death : सौंदर्य असं की भल्याभल्यांना भुरळ पडावी, अनेक सुपरस्टार सोबत सिनेमे; पण 21 व्या वर्षी मृत्यू झाल्यानं अवघी सिनेसृष्टी हळहळली होती

South cinema monal actress death : दाक्षिणात्य सिनेमात अशी सौंदर्यवान अभिनेत्री होती, जिच्या सौंदर्याची भल्याभल्यांना भुरळ पडायची. तिने अनेक साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर केली होती. दाक्षिणात्य सिनेमात अनेक सिनेमे केले होते. मात्र, अवघ्या 21 वर्षी तिचा मृत्यू झाला अन् अवघी सिनेसृष्टी हळहळली होती.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत दाक्षिणात्य अभिनेत्री मोनल आहे. अभिनेत्री मोनलने तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण केले आणि यश मिळवले, परंतु वयाच्या 21 व्या वर्षी तिने आत्महत्या केली. तिने सुपरस्टार विजयसोबत बद्री चित्रपटात काम केले होते. तिच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला होता.
जेव्हा आपण चित्रपटातील कलाकारांना पाहतो तेव्हा त्यांच्या महागड्या गाड्या, कपडे, आकर्षक जीवनशैली आणि ग्लॅमरस स्टाईल खूप लक्ष वेधून घेतात. पण सिनेमाची एक बाजू अशीही आहे ज्याच्या कथा ऐकल्यावर आपल्याला धक्का बसतो. जसे की अभिनेत्री मोनलची कहाणी आहे जिने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले आणि सुपरस्टार विजयसोबत काम केले. करिअर नवीन उंची गाठत होते तेव्हा आयुष्याने इतके दुःख दिले की एका झटक्यात सर्व काही बदलले. अभिनेत्री मोनल हिने अभिनेत्री सिमरनची धाकटी बहीण म्हणून तमिळ चित्रपटांमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
अभिनेत्री मोनलने लहान वयातच पदार्पण केले आणि सिनेमात अभिनेत्री म्हणून यश देखील मिळवले, पण वयाच्या 21 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. मोनलचा पहिला चित्रपट पारवाई ओडे पोदामे होता. नंतर तिने कुणालसोबत 'व्हॅलेंटाईन डे' या चित्रपटात काम केले. त्या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली.नंतर तिने विजयसोबत 'बद्री' चित्रपटात काम केले. विजय आणि मोनल व्यतिरिक्त, या चित्रपटात इतर अनेक कलाकार दिसले आणि तो चित्रपट हिट झाला. या चित्रपटानंतर मोनलला अनेक संधी मिळाल्या.
मोनलने समुद्रम, वारामन आलू आणि चार्ली चॅप्लिन या चित्रपटांमध्ये काम केले. मोनलने काही तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट 'अधिकम' होता. तेही त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी प्रसिद्ध झाले. 14 एप्रिल 2002 रोजी, जेव्हा मोनल मुख्य अभिनेत्री म्हणून समोर येत होती, मात्र, तिने चेन्नईतील तिच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी ती फक्त 21 वर्षांची होता. या घटनेने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली होती. मोनलने तिच्या आत्महत्येच्या दिवशी तिच्या चित्रपटाच्या पूजेमध्येही सहभाग नोंदवला होता. मोनलने आत्महत्या का केली याबद्दल अनेक बाबी चर्चेत होत्या. त्यावेळी, सिमरनने तिच्या बहिणीच्या मृत्यूसाठी कोरिओग्राफर प्रसन्ना सुजीतला जबाबदार असल्याचा आरोप केल्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपबद्दल अनेक दावे समोर आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























