एक्स्प्लोर

Bollywood Actor Struggle Life: 300 रुपये घेऊन घरातून पळून आला, 1200 कोटींच्या हिटनंतर आता 4000 कोटींच्या फिल्ममध्ये साकारणार 'सर्वात महागडा व्हिलन'

Bollywood Actor Struggle Life: एकामागून एक हिट चित्रपट देणारा हा अभिनेता आज संपूर्ण भारतातील सुपरस्टार असू शकतो, पण एक काळ असा होता की, तो 300 रुपये घेऊन पळून आलेला.

Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडचा (Bollywood News) 4000 कोटींचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'रामायण' (Ramayana Movie) सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची स्टार कास्ट आधीच जाहीर झाली आहे. तसेच, 'रामायण'ची काही सेकंदांची झलकही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. पौराणिक कथांवर आधारित असलेल्या मेगा बजेट प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री सीता मातेची (Actress Sita Mata) भूमिका साकारणार आहे. टेलिव्हिजन अभिनेता रवी दुबे (Television Actor Ravi Dubey) लक्ष्मण साकारणार आहे. अशातच 'रामायण'मध्ये रावणाच्या भूमिकेत कोण दिसणार? याबाबत मोठी चर्चा रंगलेली. 'रामायण'ची काही सेकंदांची झलक रिलीज करण्यात आली. हा अभिनेता नेमका कोण? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून साऊथ सुपरस्टार यश (South Actor Yash) आहे. 

फक्त 15 मिनिटांच्या स्क्रीन टाईमसाठी घेतलेत 50 कोटी 

साऊथ सुपरस्टार रॉकी भाई म्हणजेच, यश 'रामायण'मध्ये लंकेचा राजा रावणाची भूमिका साकारत आहे. 'रामायण' दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीला आणि दुसरा 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. 

मिडिया रिपोर्टनुसार, पहिल्या भागात यशचा स्क्रीन टाइम फक्त 15 मिनिटं असेल, परंतु यासाठी तो 50 कोटी रुपये फी घेत आहे. या प्रकल्पातील सर्वात महागडा अभिनेता रणबीर कपूर आहे, ज्यानं भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी 150 कोटी रुपये घेतलेत. यश हा 100 कोटींच्या एकूण फीसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा स्टार आहे.

कधीकाळी 300 रुपये घरातून पळून आलेला अभिनेता यश 

आज साऊथ सुपरस्टार अभिनेता यशचा समावेश कोट्यवधी कमावणाऱ्या सिनेस्टार्समध्ये केला जातो. कधीकाळी हाच यश 300 रुपये घेऊन घरातून पळून आला होता. एका जुन्या मुलाखतीत यशनं सांगितलेलं की, "मी जेव्हा बंगळुरूला आलेलो, तेव्हा खूपच घाबरलेलो. एवढं मोठं शहर पाहून अंगावर काटा आलेला. पण, माझ्यात आत्मविश्वास होता. मला माहीत होतं की, जर मी घरी परत आलो, तर पुन्हा मला बाहेर येण्याची संधी मिळणार नाही..."

यशनं सांगितलेलं की, त्यांनं थिएटरमध्ये बॅकस्टेज काम करुन आपल्या करिअरची सुरुवात केलेली. तो म्हणाला की, "सुरुवातीला मी चहा द्यायचो आणि छोटी-छोटी कामं करायचो. कोणीतरी मला थिएटरमध्ये आणलं आणि तिथून माझ्या आयुष्याला एक वळण मिळालं. मी एका दिग्दर्शकाला कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यास मदतही केली."

कठोर संघर्षातून यश आज इंडस्ट्रीत अनेकांसाठी उदाहरण बनला आहे. कधीकाळी चहा विकून पैसे कमावणारा हा अभिनेता 'रामायण'सारख्या मेगा प्रोजेक्टमध्ये फक्त 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी 50 कोटी रुपये घेतो. रावणाच्या भूमिकेतला त्याचा लूक आणि अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. 

दरम्यान, पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या केजीएफ स्टारनं कन्नड चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट दिला आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा तिसरा तिसरा कोणी नसून केजीएफ 2 आहे, ज्यानं 1200 कोटी रुपये कमाई केली. आता त्याच्या आगामी चित्रपटाचे बजेटही समोर आले आहे. 'रामायण' 4000 कोटींच्या बजेटमध्ये बनवलं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pragabha Kolekar Reveals Bad Experiences About Industry: 'चल माझ्यासोबत... फक्त तू आणि मी', मराठमोळ्या अभिनेत्रीला दुकानाच्या उद्घाटनाला बोलावलं, नंतर मालकाची नको ती मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Death News LIVE Updates: सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
Asha Bhosle Death News LIVE Updates: सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
Asha Bhosle Last Post: 'तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल...'; निधनानंतर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची अखेरची 'ती' पोस्ट VIRAL
'तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल...'; निधनानंतर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची अखेरची 'ती' पोस्ट VIRAL
Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Last Post: 'तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल...'; निधनानंतर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची अखेरची 'ती' पोस्ट VIRAL
'तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल...'; निधनानंतर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांची अखेरची 'ती' पोस्ट VIRAL
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
Asha Bhosle death last rites:
आता 93 आलं, आता जायचं! चार दिवसांपूर्वी आशाताई गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, 'आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
Embed widget