Kiccha Sudeep Mother Passed Away : कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता किच्चा सुदीप याच्या आईचं निधन झालं आहे. किच्चा सुदीपची आई सरोजा यांचं 20 ऑक्टोबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरोज वृद्धापकाळामुळे गेल्या काही काळापासून आजारी होत्या, यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुदीप आईच्या खूप जवळचा होता, तिच्या अचानक जाण्याने त्याच्या आयुष्यात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.


सुपरस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर


किच्चा सुदीपची आई सरोजा यांचं 20 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर जयनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी जेपी नगर येथील त्यांच्या कौटुंबिक घरी आणले जाईल, यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक आणि प्रियजन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.






अभिनेचा किच्चा सुदीपच्या आईचं निधन


अभिनेता किच्चा सुदीप हे घरात तीन मुलांपैकी सर्वात लहान असून त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. घरातील लहान मुलगा असल्यामुळे तो सुरुवातीपासूनच आई आणि वडिलांच्या खूप जवळचा आहे. आता आईच्या निधनामुळे त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांनी त्याच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत त्याचं सांत्वन केलं आहे. त्याची आई मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. पण ती बरी होईल अशी सर्वांना आशा होती. 






किच्चा सुदीप त्याच्या आई-वडिलांसोबतच्या जवळच्या नात्याबद्दल अनेकदा मुलाखतीत बोलला आहे. तो आईवडिलांसोबत जेपी नगरमधील घरात राहतो. सप्टेंबरच्या सुरुवातीला त्याच्या वाढदिवसाच्या आधी पत्रकार परिषदेतही त्याने सांगितलं होतं की, महाबलीपुरममधील त्याच्या शूटिंग सेटवरून बंगळुरूला पोहोचल्यावर आईवडिलांना भेटणे आणि इतर कामासाठी जाण्यापूर्वी त्यांच्यासोबत वेळ घालवणे, हे त्याचं प्राधान्य होतं.


बिग बॉस कन्नड' होस्ट किच्चा सुदीप


अभिनेता किच्चा सुदीप सध्या 'बिग बॉस कन्नड' होस्ट करत आहे. तो ॲक्शन थ्रिलर चित्रपट मॅक्सच्या रिलीजची देखील वाट पाहत आहे. किच्चा सुदीप 'मक्खी' या चित्रपटातून चांगलाच लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये नानी आणि समंथा देखील झळकले होते.