South Actor Bala Ex Wife Elizabeth Udayan: दाक्षिणात्य अभिनेता बाला (South Indian Actor Bala) यांची घटस्फोटीत पत्नी एलिझाबेथ उदयन (Elizabeth Udayan) सध्या रुग्णालयात दाखल असून तिनं रुग्णालयाच्या बेडवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधून तिनं अभिनेता बालावर अनेक खळबळजनक आणि हादरवणारे आरोप केले आहेत. तसेच, तिनं बालावर फसवणूक केल्याचा आणि शारीरिक छळ केल्याचाही आरोप केला आहे. तिनं असंही म्हटलं आहे की, जर तिला काही झालं तर, यासाठी अभिनेता बाला जबाबदार असेल.
अभिनेता बालाविरुद्ध आरोप नेमका काय?
अभिनेत्याच्या घटस्फोटीत पत्नीनं फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि म्हटलं की, "मला मरण्यापूर्वी न्याय मिळेल का?" तसेच, तिनं असंही म्हटलंयकी, "या देशात फक्त श्रीमंतांनाच न्याय मिळतो का?" ती म्हणाली की, "मी या अवस्थेत जबरदस्तीनं व्हिडीओ बनवत आहे. गोष्टी माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेल्या आहेत. मला धमक्या देणारे व्हिडीओ येत आहेत. माझ्यावर खटले दाखल केले जातायत. मला माझ्या कुटुंबाचे रक्षण करण्यास सांगितलं गेलंय. मला पैसे शोषणारी असं म्हणत हिणवलं गेलंय..."
बाला आणि उदयन एलिझाबेथनं लग्न केलं की, नाही?
अभिनेता बालाच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं म्हटलंय की, "बालाचं म्हणणं आहे की, त्यांचं लग्न झालेलं नाही. ना कोणताही समारंभ झालेला. अभिनेत्याचं म्हणणं आहे की, मी त्यांच्याबद्दल खोट्या कहाण्या रचतेय. तर त्यांनी मला त्यांची पत्नी म्हणून लोकांसमोर आणलंय. त्यांनी मला त्यांच्यासोबत अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांमध्ये सोबत नेलंय." ती पुढे म्हणते की, "जर मला काही झालं तर, त्यासाठी सर्वस्वी बाला जबाबदार असेल."
"पोलीस माझी तक्रार नोंदवत नाहीत. मी याबद्दल मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली होती. यानंतर माझी तक्रार डीवायएसपी कार्यालयात पाठवण्यात आली. ते एकदा चौकशीसाठी माझ्या घरी आले होते. त्यानंतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. न्यायालयात खटला सुरू आहे. अनेक वेळा असं घडलंय की, बाला आणि त्यांचे वकील न्यायालयात हजर राहिले नाहीत.", असं एलिझाबेथनं सांगितलं
खरंच अभिनेत्यानं 4 वेळा लग्न केलंय?
अभिनेता बालाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं चार लग्न केलीत. 2008 मध्ये त्यानं चंदना सदाशिवशी लग्न केलं होतं, पण लग्नाच्या एका वर्षानंतर दोघांचाही घटस्फोट झाला. अभिनेत्यानं गायिका अमृता सुरेशशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलेली, पण 9 वर्षांनी दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले. उदयन ही अभिनेत्याची तिसरी पत्नी होती. दोघांनी 2021 मध्ये लग्न केलं होतं, पण 2024 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. 2024 मध्येच बालानं कोकिलाशी चौथं लग्न केलं.
दरम्यान, अभिनेता बाळा एका मुलाचा पिता देखील आहे. पण मनोरमा ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यानं म्हटलं होतं की, त्याचं फक्त दोनदा लग्न झालंय. अभिनेत्याच्या मते, त्याची पहिली पत्नी चंदना होती आणि दुसरी पत्नी कोकिला आहे. सध्या या संपूर्ण वादात बालाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उदयन म्हणतो की, ती सतत न्याय आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करतेय, पण आतापर्यंत तिला न्याय मिळालेला नाही आणि परिस्थिती गंभीर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
