Sonu sood: अमेरिका- इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगात वेठीस धरले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत 5 हजाराहून अधिक बॉम्ब इराणवर टाकले आहेत. इराणच्या 20 युद्धनौका उध्वस्त झाले आहेत. एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. इरणने प्रत्युत्तर म्हणून देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले केलेत. दुबईतील काही ठिकाणीही हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान, युद्धाच्या या धामधुमीत अनेक नागरिक, पर्यटक, भारतीय कलाकार परदेशात अडकून पडले आहेत.विस्कळीत हवाई वाहतुकीमुळे अनेक विमाने रद्द झाली. आणि दुबईत मायभूमीपासून शेकडो किलोमीटर दूर नागरिक अडकून पडले. युद्धाच्या छायेत गांगरून गेलेल्या, अडकलेल्या नागरिकांसाठी आता बॉलीवूड कलाकार मदतीसाठी पुन्हा धावून आला आहे. दुबईत अडकून पडलेल्या  लोकांसाठी  अभिनेता सोनू सूद आता मोफत राहण्याची व्यवस्था करणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने याबद्दल माहिती दिली आहे. (Sonu Sood Video)

Continues below advertisement

काय म्हणाला सोनू सुद? 

सोनू सूद म्हणाला," सर्वांना नमस्कार. जे कोणी लोक सध्या सुरू असलेल्या अडचणींमुळे दुबईमध्ये अडकले असतील त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की तुम्हाला राहण्यासाठी जागा आहे. आम्ही   तुमची मोफत राहण्याची सोय करत आहोत. भारतीय किंवा कोणतेही नागरिकत्व असलेले लोक जे दुबईत अडकले आहेत, त्यांनी मला instagram वर किंवा @sonu_sood किंवा @dugastaproperties ला Dm करा. तुम्ही तुमच्या मायदेशी परत जाईपर्यंत तुमची मोफत राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू. जय हिंद. " असं म्हणत सोनू शोधणे हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

 

Continues below advertisement

युद्धामुळे दुबईमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाकडे राहण्यासाठी जागा नसेल तर आम्ही सुरक्षित राहण्यासाठी जागा मोफत उपलब्ध करून देत आहोत. यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असण्याची गरज नाही. कोणत्याही अटी नाहीत. ही फक्त माणुसकी आहे. मदत हवी असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर डीएम करा. ही पोस्ट शक्य तेवढी शेअर करा जेणेकरून हे गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल, असे आवाहनही सोनू सूदने केले आहे.