Sonu Sood announce help for Farmer : लातूर जिल्ह्यातील हाडोळतीचे शेतकरी अंबादास पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई पवार हे खर्च परवडत नसल्याकारणाने बैलाच्या ठिकाणी स्वतः औतला राहून मशागत करत होते. ही बातमी एबीपी माझाने तीन दिवसांपूर्वी चालवल्यानंतर अनेक राजकारण्यांनी त्याची नोंद घेतली. यावर विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांना अधिवेशनादरम्यान जाबही विचारला. दरम्यान, या शेतकऱ्याचा संघर्ष सर्वांना समजल्यानंतर आता लोकांनी शेतकरी दाम्पत्यास मदत करण्यास सुरुवात केली आहे. 

अभिनेता सोनू सूदचं शेतकऱ्याला बैलजोडी देण्याचं आश्वासन 

दरम्यान, बैलाच्या ठिकाणी स्वतः औतला राहून मशागत करणाऱ्या दाम्पत्याला पाहून अभिनेता सोनू सूद देखील भावूक झालेला पाहायला मिळालाय. अभिनेता सोनू सूद याने या परिवाराशी फोनवर संपर्क साधलाय. येत्या काही दिवसात बैल जोडी पाठवून देतो, असं आश्वासन अभिनेता सोनू सूद याने दिलं आहे.... महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या बाबत राहुल गांधी यांनीही ट्विट केलं होतं. यावरून काँग्रेस नाही आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादीही मदत करण्यासाठी सरसावली 

हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांची भेट घेत काँग्रेस अजित पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी 40 हजार रुपये नगदी स्वरूपात दिलं आहेत..तसेच नातवाच्या शिक्षणाचा सर्व खर्च ही करण्याचे आश्वासन दिले आहे. अजित पवार यांच्या पीएने त्याच्याशी फोन वर संपर्क करून सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात केवळ 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हा फक्त आकडा नाही. हे 767 उध्वस्त झालेले संसार आहेत. ७६७ कुटुंबं जी कदाचित कधीच सावरू शकणार नाहीत.  आणि सरकार? शांत आहे. निर्विकारपणे हे सगळं पाहतंय. शेतकरी दररोज कर्जाच्या दलदलीत आणखी खोल जातोय — बियाणं महाग, खत महाग, डिझेल महाग… पण MSP (किमान आधारभूत किंमत) ची काही हमीच नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

पण ज्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे? त्यांचे कर्ज मोदी सरकार सहज माफ करतं. मोदींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार — पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचं आयुष्यच अर्धं झालंय. ही सिस्टिम शेतकऱ्यांना मारत आहे — हळूहळू, पण सातत्याने… आणि मोदीजी मात्र आपल्या PR चा तमाशा पाहतायत.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sonu Sood : लातूरच्या वृद्ध जोडप्याचा शेत नांगरतानाचा व्हिडीओ व्हायरल; सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाला, "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।"