Sonu Nigam Helps Lost Boy at Concert: काही गायक वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. तर काही गायक अत्यंत सॉफ्ट हार्टेड असतात. नुकतंच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमची दयाळू बाजू समोर आली. सोनू निकमने कॉन्सर्टमध्ये असं काही केले की, जे थेट काळजात भिडलं. कर्नाटकच्या हुबळी येथे सोनू निकमच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोनू निकमला ऐकण्यासाठी सुमारे 30,000हून अधिक जण उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात एक मोठी घटना घडली. श्री साई नावाचे लहान मुल कॉन्सर्टच्या गर्दीत हरवले. सोनू निकमने मुलाला स्टेजवर बोलावून घेतलं. तसेच घाबरलेल्या मुलाची मदत केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये श्री साई या मुलासोबत स्टेजवर दिसत आहे. त्याने मुलाला स्टेजवर बोलावून घेतलं आणि त्याच्यासोबत गप्पा मारल्या. तसेच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी, सोनूने मुलाची भीती कमी करण्यासाठी आणि सर्वकाही सुरक्षित आहे, याची खात्री देण्यासाठी त्याने गाणे गायले. "श्री साईच्या आई वडिलांनी मुलाला घेऊन जावे. श्री साईचे आई वडील हरवले आहेत. लवकर येऊन मुलाला घेऊन जा", असं त्याने सुरात म्हटले.
यानंतर मुलाने निरागसपणे म्हटले, "पापा इथे नाहीत", मग सोनूने विचारले की तू कुणासोबत आला आहेस? मग मुलाने सांगितले की, तो त्याच्या काकासोबत इथे आला आहे. त्यानंतर सोनूने 'चाचू चाचू कुठे? चाचू तू चाचीसोबत निघून गेलास का?' त्यानंतर सोनू हसत म्हणाला, 'तुझ्या मोठ्या भावाने तुला मुलाची जबाबदारी दिली, आणि तू हे करत आहेस का?' असं म्हणत सोनू हसला. या संपूर्ण क्षणाने प्रेक्षकांना केवळ हसवले नाही तर, मुलाचीही भीती कमी केली.
काही वेळानंतर श्री साईचा काका कॉन्सर्ट टीमकडे गेला. त्याचा काका स्टेजजवळ गेला, तसेच श्री साईला बोलावून घेतलं. काकाची ओळख पटल्यानंतर सोनू निगमने मुलाला काकाच्या स्वाधीन केले. यानंतर श्री साई सुरक्षितपणे घरी पोहोचला. या गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सोनूचं कमेंटद्वारे कौतुक केलं आहे.
