Sonu Nigam on CJP Protest Reaction: लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) अनेक मुद्द्यांवर कायम आपलं मत मांडत असतो. धार्मिक स्थळांवरील लाउड स्पीकरपासून कलाकारांना रॉयल्टी मिळण्याच्या अधिकारापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्याने याआधी आवाज उठवलाय. मात्र, नीट पेपरफुटीनंतर (NEET Paperleak) कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावर सोनू निगमने बोलणे टाळले. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात त्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो प्रश्न माध्यमांवरच भडकला होता. 'आता बास झालं..एवढंच' असं म्हणत तो निघून गेला होता. त्यानंतर सोनू निगमला प्रचंड ट्रॉलिंगचा सामना करावा लागला. मात्र, आता 'बॉम्बे टाइम्स'ची बोलताना त्याने आंदोलन सुरू असताना तो गप्प का राहिला? याचं कारण स्पष्ट केलंय.

Continues below advertisement

काय म्हणाला सोनू निगम?

सोनू निगमच्या प्रतिक्रियेनंतर, सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची राळ उठली होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला ' मुंबईत गेल्या तीन दशकात मी कुठल्याही पत्रकार परिषदेसाठी एक मूलभूत शिष्टाचार शिकलो आहे. नेहमी कार्यक्रमाच्या अजेंड्यावर चिटकून राहायचं, आणि संभाषण कुठल्याही निरर्थक मुद्द्याकडे भटकू द्यायचं नाही.तुम्ही तुमचे गुरु पंकज उधास यांना श्रद्धांजली देण्यासाठी आला आहात, त्यावेळी राजकारणावर चर्चा करणं हे माझ्या दृष्टीने अनादर करण्यासारखं आहे. मी माझ्या वडिलांना वचन दिलं आहे की, मला माहीत नसलेल्या कुठल्याही गोष्टीवर मी भाष्य करणार नाही.' असं सोनू निगम म्हणाला. 

सोनू निगमने असंही सांगितलं,सुरुवातीला तो आपलं म्हणणं मोकळेपणाने व्यक्त करायचा. तो म्हणाला," माझा फोनमध्ये सोशल मीडिया नाही. याशिवाय मी माझ्या आयुष्यात अनेक विषयांवर भूमिका घेतली आहे आणि व्यवस्थित अनेक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धार्मिक स्थळांवर लाऊड स्पीकरच्या वापरावरून आवाज उठवण्यापासून ते कलाकारांसाठी रॉयल्टीच्या अधिकाऱ्यापर्यंत, मी एकट्याने पुढाकार घेतला आहे. आता इतरांनी धैर्य दाखवून भूमिका घेऊ द्या आणि ते काय बदल करू शकतात ते पाहू द्या..' असं तो म्हणाला.

Continues below advertisement

नीट पेपरफुटीवर बोलणं टाळलं..

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पत्रकार सोनू निगमला विद्यार्थी आंदोलनाबाबत त्याचे मत विचारताना दिसतात. मात्र, "मी इथे या विषयावर बोलण्यासाठी आलेलो नाही," असे सांगत त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पत्रकारांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर सोनू काहीसा नाराज झाल्याचं दिसलं. नंतर तो, "अभी हो गया, बस," असे म्हणत तिथून निघून गेला.