Sonam Khan : ज्येष्ठ अभिनेत्री सोनम खान (Sonam Khan) यांनी 1989 साली आलेल्या ‘मिट्टी और सोना’ या चित्रपटात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीचे आणि एका तवायफचे असे दुहेरी आणि आव्हानात्मक पात्र साकारले होते. या भूमिकेसाठी त्यांनी स्वतः रेड-लाइट एरियामध्ये जाऊन तिथले जीवन अनुभवले आणि आपल्या भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय दिला.
सोनम खान (Sonam Khan) यांनी सांगितले की ‘मिट्टी और सोना’ हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वेगळा अनुभव होता. आपल्या ग्लॅमरस इमेजपासून वेगळं काही करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी या चित्रपटात कॉलेज गर्ल आणि तवायफ अशी दोन भिन्न भूमिका स्विकारल्या.
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सोनम (Sonam Khan) यांनी त्या चित्रपटातील काही जुने फोटो शेअर केले. त्या वेळेस त्यांचं वय केवळ 15-16 वर्षं होतं. त्या वयात त्यांनी रेड-लाइट एरियात जाऊन तिथले वास्तव पाहिले. या अनुभवाने त्यांना केवळ हिंमत नाही तर समजही दिली, ज्यामुळे त्या भूमिकेला अधिक वास्तवदर्शीपणे साकारता आले.
त्यांनी लिहिले, "‘मिट्टी और सोना’ माझ्या काळजाचा विषय आहे, आवडता चित्रपट आहे... यात मी एका कॉलेज गर्ल आणि एका तवायफची भूमिका केली होती. हो, ही भूमिका करणे खूप आव्हानात्मक होते."
सोनम (Sonam Khan) पुढे म्हणाल्या, "मला कॉलेज स्टुडंट आणि वेश्यावृत्तीमध्ये अडकलेल्या मुलींच्या वागणुकीवर अभ्यास करावा लागला. मी या चित्रपटातून काहीतरी सिद्ध करायचं होतं, पण नेमकं काय सिद्ध होईल, याची त्यावेळी मलाही कल्पना नव्हती."
त्यानंतर त्यांनी लिहिलं, "लोक मला नेहमीच ‘ग्लॅमरस सोनम’ म्हणून ओळखत होते – मी बिनधास्त बिकिनी घालणारी अभिनेत्री होते. पण या चित्रपटाने मला माझ्या केवळ चार वर्षांच्या अल्प पण लक्षात राहिलेल्या कारकिर्दीत हे सिद्ध करण्याची संधी दिली की मी केवळ ग्लॅमरस नाही, तर चांगली अभिनेत्री देखील आहे."
सोनम (Sonam Khan) यांनी असंही सांगितलं की त्या रेड-लाइट एरियात लपून-छपून जात असत, कारण कोणीतरी ओळखू नये म्हणून. त्या तिथल्या मुलींचं वर्तन, त्यांचा स्वभाव, त्यांचा संघर्ष यांचा अभ्यास करत असत. "मी काही मुलींशी बोललेही. त्यांच्याकडून मला दु:ख, भीती आणि असुरक्षिततेची जाणीव झाली," असंही त्यांनी लिहिलं. चित्रपटाचं चित्रीकरण देखील अनेक घटनांनी भरलेलं होतं.
एक आठवण सांगताना सोनम म्हणाल्या, "मला एक सीन करायचा होता, ज्यात मला स्किन कलरचा एक छोटासा, स्ट्रॅपलेस ड्रेस घालावा लागणार होता. तो ड्रेस असा होता की जणू काही अंगावर कपडेच नाहीत. हा सीन कॅमेराच्या अँगलसाठी आणि दृश्याच्या प्रभावासाठी आवश्यक होता. सुरुवातीला मी तयार झाले होते, पण नंतर मी रडू लागले आणि सीन करायला नकार दिला."
शेवटी त्या म्हणाल्या, "त्या वेळी माझं वय फक्त 15-16 वर्षं होतं. मेकअप रूममध्ये खूप समजावल्यावर मी सेटवर गेले आणि तो सीन पूर्ण केला. मला हिम्मत दिली त्या मुलींनी, ज्या मला काही वर्षांपूर्वी रेड-लाइट एरियामध्ये भेटल्या होत्या."
इतर महत्त्वाच्या बातम्या
'किरण त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं', किरण मानेंची पोस्ट चर्चेत