Sohail Khan Weight Loss Reason: सलमान खाननंतर त्याचा भाऊ सोहेल खानची चर्चा होत आहे.  सलमान खानचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. त्याचं अचानक घटलेलं वजन पाहून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली.  दरम्यान, आता सोहेल खानचं घटलेलं वजन पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.  सोशल मीडियावर सध्या सोहेल खानचे फोटोस व्हायरल होत आहे. त्याचं कमी झालेलं वजन, आत गेलेले गाल पाहून चाहत्यांनी, वेट लॉस का केलं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.  अलिकडेच सोहेल खान 'द अलायंस'मध्ये झळकला होता. त्याची प्रचंड चर्चा झाली होती. आता त्याला बारीक झालेलं पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.  दरम्यान, या वेट लॉसवर सोहेल खानने प्रतिक्रिया दिलेली आहे.

Continues below advertisement

सोहेल खानच्या वेट लॉसची सोशल मीडियात चर्चा (Sohail Khan Breaks Silence On His Dramatic Weight Loss)

अलिकडेच, इंटरनेटर सोहेल खानच्या तब्येतीविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. मीम्स तयार केले जात आहे.  आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 55 वर्षीय सोहेल खानने  स्वत: पुढे येत त्याने यावर मौन सोडले आहे. त्याने वेट लॉस का केलं आहे? यावर भाष्य केलं आहे. 'द अलायंस' नंतर सोहेल खान लक्षणीयरित्या बारिक झालेला दिसत होता. ज्यामुळे इंटरनेटवर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेचे बाण सोडले.   वजन कमी करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. चाहत्यांना त्याच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू लागली.   इंटरनेटवर अनेक प्रकारचे तर्क वितर्क पसरू लागले. 

आपल्या प्रकृतीबद्दल  सुरु असलेल्या चर्चांवर, सोहेल खानने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली.  या मुलाखतीत त्याने सांगितलं की,  ''द अलायंस'मध्ये वाईल्डकार्ड स्पर्धक  म्हणून सहभाग होणे, हा त्याचा पहिला रिअॅलिटी शोचा पहिला अनुभव होता. सुरुवातील घरात प्रवेश केल्यावर  क्लॉस्ट्रोफोबिया जाणवला.  या कारणामुळे प्रचंड अस्वस्थ वाटू लागले', असं सोहेलने सांगितलं. 'घरातील तणावपूर्ण वातावरणामुळे त्याला पोटाच्या संबंधित आजार सुरु झाला'. त्याने मुलाखतीत स्पष्ट केलं की,  तो शोच्या पहिल्या आठवड्यापासून आजारी होता. परंतु, घरातील सदस्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकीमुळे तो पाच आठवडे शोमध्ये टिकून राहिला, असं त्याने सांगितलं.

Continues below advertisement

सोहेलने यावेळी स्पष्ट केले की, त्याने कोणतेही फॅट बर्नरचा वापर केलेला नाही. शोमधील आव्हाने पूर्ण करण्यासाठी त्याला खाण्यापिण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागले. त्याचे वजन कोणत्याही औषधांमुळे कमी झाले नसल्याचं सोहेल खानने यावेळ स्पष्ट केलं.   

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास