एक्स्प्लोर

Ankita Prabhu Walawalkar Supports Pranit More: 'प्रणितला वोट आणि तुला कपडे पाठवू...'; महाराष्ट्रीयन भाऊला डिवचणाऱ्या बसीरला कोकण हार्टेड गर्लनं थेट सुनावलं 

Ankita Prabhu Walawalkar Supports Pranit More: अंकितानं बिग बॉसमधल्या बसीर आणि प्रणितच्या भांडणाची एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये दोघांमधील भांडण विकोपाला जातं.

Ankita Prabhu Walawalkar Supports Pranit More: 'बिग बॉस 19'चा (Bigg Boss 19) सीझन सध्या रंगात आला आहे. यंदा हिंदी बिग बॉसच्या घरात मराठमोळा महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे (Pranit More) स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रणित मोरेच्या समर्थनात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मराठी प्रेक्षक आणि एक्स बिग बॉस कन्टेस्टंट्स सरसावले आहेत. बिग बॉसच्या अलिकडच्याच भागात प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. खरं तर भांडण होतं प्रणित आणि अमालचं, पण या दोघांच्या वादात उडी घेतली बसीर अलीनं. त्यानंतर वादाला वेगळं वळण मिळालं आणि बसीर आणि प्रणित याच्यांत जोरदार भांडण झालं. अशातच आता दोघांचे फॉलोअर्स आपापसांत भिडले आहेत. तर, प्रणितच्या सपोर्टसाठी बिग बॉस मराठीचे स्पर्धक सरसावले आहेत. सर्वात आधी डीपी दादानं प्रणितसाठी व्हिडीओ केला. अशातच आता सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिनं एक व्हिडीओ शेअर करत प्रणित मोरेची बाजू घेतली आहे.  

अंकिता व्हिडीओमध्ये काय म्हणाली? 

अंकितानं बिग बॉसमधल्या बसीर आणि प्रणितच्या भांडणाची एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये दोघांमधील भांडण विकोपाला जातं आणि बसीर रागात प्रणितला म्हणतो की, "गो बॅक टू युअर व्हिलेज..." बसीरच्या याच वाक्याचा समाचार अंकितानं तिच्या व्हिडीओमध्ये घेतला आहे. अंकिता म्हणते की, "हा म्हणतोय गो बॅक टू युअर व्हिलेज, जसा हा मोठ्या शहरातून आला आहे. आलोय आम्ही गावातून... आमच्या गावातील लोक प्रणितला इतके वोट करतील ना आणि त्या वोट्ससह तुला कपडेही पाठवून देतील..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

अंकिता पुढे म्हणाली की, "हीच ती वेळ आहे, अख्ख्या महाराष्ट्राने वोट करा... सगळ्या मराठी लोकांनी, गावातल्या गाववाल्यांनी... आता तर आम्हाला बघायचंच आहे की, गावी कोण परत जातंय ते... प्रणितला आता आतच ठेवायचं, तो बाहेर येताच कामा नये..."

अंकितानं आणखी एक क्लिप शेअर करुन म्हटलंय की, "बिग बॉसच्या घरात आतमध्ये गेल्यानंतर काय वाटतं, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल. प्रणितचीही अवस्था तशीच झालीये. आपण असे नाही आहोत की, उगीच जाऊन किडे करा, मुद्दे बनवा आणि त्यावर भांडून दाखवा. आपल्या भावाला सपोर्ट करा, भरपूर वोट्स करा..." त्यानंतर अंकिता कुणालाही विचारते की, कुणाला वोट करायचंय? तर तो लगेच उत्तर देतो, "कुणाला काय? प्रणितला वोट करायचंय..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Abhijit Panse On Anand Dighe: अपघात झाला तेव्हा आनंद दिघे माझ्या पुढच्या गाडीत होते, अभिजीत पानसेंनी सांगितला 'तो' प्रसंग

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget