Snehal Tarde On Deool Band 2: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) गाजलेला सिनेमा 'देऊळ बंद'च्या (Deool Band) पार्श्वभूमीवर आता पुढचा भाग 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) आलाय. सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Marathi Movie Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे, आता आलेल्या 'देऊळ बंद 2' हा सिनेमा 'देऊळ बंद' सारखाच सुपरडुपर हिट ठरलाय. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटर्समध्ये झुंबड उडाली आहे.

Continues below advertisement

सिनेमात अभिनेत्री स्नेहल तरडे (Actress Snehal Tarde), ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्या सिनेमात गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं राघव शास्त्रींची मध्यवर्ती भूमिका साकारलेली. पण, दुसऱ्या सिनेमात मात्र, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत दिसली. दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी मात्र, यावेळी कथाच बदलली आणि त्यासोबतच सिनेमातलं मुख्य पात्रसुद्धा बदललं. याचबाबत नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी तुम्हालाच 'देऊळ बंद 2'मध्ये मध्यवर्ती भूमिका का दिली? असा प्रश्न 'मटा कट्टा'वर स्नेहल तरडेला विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.  

स्नेहल तरडे नेमकं काय म्हणाली? (Snehal Tarde On Pravin Tarde)

Continues below advertisement

अभिनेत्री स्नेहल तरडे हिनं सांगितलं की, "अभिनय ही माझी आवड आहे. कॉलेजच्या दिवसात आणि नंतरही मी काम केलंय. पण मध्यंतरीच्या काळात संसारातील जबाबदाऱ्यांमुळे अनेक वर्षं अभिनयापासून दूर राहावं लागलं. त्यानंतर पुन्हा एकदा मी काम करण्यासाठी तयार होत होते. अशा वेळी 'देऊळ बंद 2'सारख्या मोठ्या सिनेमात माझ्या आवडत्या लेखक-दिग्दर्शकाकडून मध्यवर्ती भूमिकेसाठी विचारणा होणं, हे माझ्यासाठी आनंददायी होतं. प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे म्हणून मला सिनेमात घेतलेलं नाही. त्याच्या नजरेत ती व्यक्तिरेखा मी चांगली साकारू शकते; म्हणून त्यानं माझी निवड केली..."

'देऊळ बंद' (Deool Band) मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Actor Mohan Joshi) यांनी आपल्या सशक्त अभिनयानं आणि आवाजानं स्वामी समर्थ (Swami Samartha) अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभं राहून आपल्याशी संवाद साधत आहेत, असं प्रेक्षकांना वाटत होतं. तेच सर्वांना 'देऊळ बंद 2'मध्ये अनुभवायला मिळालंय. 80 वर्षांच्या मोहन जोशींचा अभिनय पाहून सर्वांना खरोखरंच स्वामीच समोर उभे असल्याचा भास होत आहे.  

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' सिनेमात यावेळी एका शेतकरी महिलेची संघर्षमय कथा पाहायला मिळालीय. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट देवाला जाब विचारणारी ही महिला कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. अभिनेत्री स्नेहल तरडेनं ही भूमिका साकारली असून, मोहन जोशी श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

ABP माझाच्या बातम्या LIVE...