Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
त्यानंतर काही काळातच हे लग्न रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली आणि अखेर दोघांनीही स्वतंत्र अधिकृत निवेदन जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली.

Smriti Mandhana Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना सध्या पुन्हा चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्मृतीच्या बालपणीच्या मित्राने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, पलाश मुच्छलवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याआधी क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचा विश्वासघात केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. आता स्मृतीच्या मित्रासोबत 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप पलाशवर करण्यात आल्यानंतर आता लग्नाच्या वेळी पलाश एका महिलेसोबत रंगेहाथ पकडला गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे . विज्ञान माने नावाच्या व्यक्तीने ही आरोप केले असून हा स्मृतीचा बालपणीचा मित्र असल्याचं कळतंय. दरम्यान, या सर्व आरोपांवर पलाश मुच्छल याने अखेर मौन सोडत सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते.
पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होता. मात्र, सुरुवातीला स्मृतींच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. वडिलांपाठोपाठ पलाशही रुग्णालयात असल्याचं कळल्याने मोठी खळबळ उडाली होती.त्यानंतर काही काळातच हे लग्न रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली आणि अखेर दोघांनीही स्वतंत्र अधिकृत निवेदन जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली.
दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडल्याचा आरोप
काही महिन्यांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. याआधी पलाश मुच्छलवर 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाल्याचंही समोर आलं होतं. त्या प्रकरणात पलाशने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपली बाजू मांडली होती. आता स्मृती मंधानाच्या बालपणीच्या मित्राने, विज्ञान माने यांनी, या मोडलेल्या लग्नाबाबत धक्कादायक दावे केले आहेत. माने यांच्या म्हणण्यानुसार, पलाश मुच्छलने स्मृतीची फसवणूक केली आणि स्मृतीने त्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडलं.
बालपणीच्या मित्राचा गंभीर दावा
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत विज्ञान माने म्हणाले, “मी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या लग्न समारंभाच्या वेळी तिथे उपस्थित होतो. तेव्हा पलाश दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडला गेला. तो प्रसंग अतिशय धक्कादायक होता. त्यानंतर काही भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला मारहाण केल्याचंही पाहायला मिळालं.”
विज्ञान माने यांनी मुच्छल कुटुंबावरही गंभीर आरोप करत “संपूर्ण कुटुंब फसवणूक करत असल्याचा” दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, मंधाना कुटुंबानेच त्यांची ओळख पलाशशी करून दिली होती आणि पलाश लग्नानंतर सांगलीत स्थायिक होईल, अशी त्यांची अपेक्षा होती.
फसवणूक आणि ब्लॅकमेलचे आरोप
विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांच्यावर 40 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करत सांगलीत तक्रार दाखल केल्याचं सांगितलं आहे.
“मागील महिन्यात मी पलाशच्या आई अमिता मुच्छल यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की चित्रपट रिलीजसाठीचा बजेट आता 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आणि माझ्याकडून अजून 10 लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास मला गुंतवलेली रक्कम परत मिळणार नाही, असं सांगून मला ब्लॅकमेल करण्यात आलं.” माने यांच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे पलाश मुच्छलविरोधात सर्व पुरावे असून, ते हे पुरावे पोलीस आणि माध्यमांसमोर सादर करण्यास तयार आहेत.
पलाश मुच्छल काय म्हणाला?
पलाश मुच्छल म्हणाला की, "मी सांगू इच्छितो की सांगलीच्या विज्ञान मानेने याने सोशल मीडियावर माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून त्यात कोणतंही तथ्य नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. माझे वकील श्रेयांश मिथरे यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील".

























