Smita Patils Bold Stand on Women Representation: स्मिता पाटील. बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील  सु्प्रसिद्ध आणि "टॅलेंटेड अभिनेत्रीपैंकी एक नाव. त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत विविध भूमिका साकारत महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये अजरामर आहे. स्मिता पाटील यांनी आतापर्यंत महिलांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी नेहमीच उठवला. त्यांनी अनेकदा चित्रपटांमध्ये महिलांचं चित्रण करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच महिलांना वस्तू म्हणून दाखवल्याबद्दल बॉलिवूडवर जोरदार टीका केली. महिलांना बोल्ड आणि अर्धनग्न दाखवल्याबद्दल त्यांचा विरोध होता. त्यांनी मुलाखतीतून आपला विरोध कायम दर्शवला.

Continues below advertisement

स्मिता पाटील यांना कधीही ग्लॅमरस भूमिका करण्यात रस नव्हता.  त्यांनी कायम वास्तविक जीवन, संघर्ष आणि भावना दर्शवणारे चित्रपट  निवडले.  एका जुन्या मुलाखतीत त्यांनी उघडपणे सांगितले की, केवळ अर्धनग्न महिला पात्रांमुळे चित्रपट  हिट मानणे चुकीचे आहे. ते म्हणाले, "तुम्ही नायकाला अर्धनग्न दाखवू शकत नाही. त्यातून काहीही होणार नाही.  पण जर तुम्ही एखाद्या महिलेला अर्धनग्न दाखवले तर, तो चित्रपट पाहण्यासाठी आणखी 100 लोक येतील. ही गोष्ट भारतीय प्रेक्षकांवर लादली गेली आहे की, पहा यात  सेक्स आहे.  अर्धनग्न शरीर दाखवण्यात आले आहे, म्हणून तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी यावं.. ही एक अशी वृत्ती बनली आहे, जी अत्यंत चुकीची आहे. जर  एखादा चित्रपट हिट करायचा असेल तर, या गोष्टी गरजेचे आहेच असं नाही.  अशा पोस्टर्समुळे  चित्रपट चालत नाही", असं मत स्मिता पाटील यांनी व्यक्त केलं.

Continues below advertisement

"पुरूषांना नग्न दाखवण्याचा विचारही कुणी करू शकत नाही.  परंतु, महिलांना अर्धनग्न दाखवून हे एकप्रकारे मार्केटिंगचं साधन म्हणून वापरलं जात होतं", असं स्मिता म्हणाल्या. स्मिता या दृष्टिकोनाच्या पूर्णपणे विरोधात होत्या.  त्यांच्या मते,  यामुळे महिलांच्या प्रतिमा खराब होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सत्यम शिवम सुंदरम असो किंवा राम तेरी गंगा मेली, अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना अर्धनग्न दाखवण्यात आले. त्यांनी  याचा कायम विरोध केला.  दरम्यान,  चक्र या चित्रपटात स्मिता पाटील यांचा एक आंघोळीचा एक सीन होता.  हा सीन चित्रपटाच्या पोस्टरवर वापरण्यात आला होता. देशभरात या चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा झाली होती. 

स्मिता यांनी खूप लवकर आयुष्याचा निरोप घेतला. 13 डिसेंबर 1986 रोजी, बाळंतपणानंतरच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.  त्यांच्या मृत्यूनंतर सिनेसृ्ष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांचे चित्रपट आजही आवर्जून पाहिले जातात.