Smirti Mandhana Palash Muchhal Patch Up Rumors: भारताच्या महिला क्रिकेट संघाची (India's Women's Cricket Team) स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smirti Mandhana) आणि बॉलिवूडचा सुप्रसिद्ध म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palash Muchhal) गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही वर्षांपासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. 2025 नोव्हेंबरमध्ये दोघेही एकमेकांशी लग्न करणार होते. लग्नापूर्वीच्या सर्व विधी झाल्या आणि नेमकं लग्नाच्या आदल्या रात्रीच काहीतरी घडलं, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. सर्वात आधी तर लग्न काही दिवसांसाठी पुढे ढकलल्याचं सांगितलं गेलं, पण त्यानंतर वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आणि काही दिवसांतच लग्न मोडल्याचं स्मृती मानधनानं जाहीर करुन टाकलं. काय झालं? कसं झालं याबाबत अनेक गोष्टी पुढे आल्या. पण, आजवर खरं कारण कुणालाच ठाऊक नाही. अशातच आता पुन्हा एकदा दोघांचं पॅचअप तर नाही ना झालं? अशा चर्चा सुरू आहेत. 

स्मृती मानधनानं आजवर पलाशचं नाव घेऊन किंवा त्याच्यावर कधीच काही म्हटलेलं नाही. तर, पलाशनं नेहमीच त्याच्याविषयीच्या चर्चांना किंवा त्यानं स्मृतीला धोका दिला असल्याचे आरोप फेटाळून लावलेत. आता एक लेटेस्ट व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळालं. व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल एकत्र येणार असल्याच्या अपेक्षा जाग्या झाल्या आहेत. 

पलक मुच्छल, स्मृती मानधनाचे वडील दिसले एकत्र (Palak Muchhal Smirti Mandhanas Father Video)

खरं तर, नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पलाश मुच्छलची बहीण, पलक मुच्छल, ही स्मृती मानधनाच्या वडिलांसोबत, श्रीनिवास मानधना यांच्यासोबत, दिसून आली आहे. या प्रसंगी संगीत दिग्दर्शक मिथुन देखील उपस्थित होते. हे तिघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आलेत. 

या व्हिडीओमध्ये, पलक मुच्छल स्मृती मानधनाच्या वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाया पडताना दिसतेय. हा व्हिडीओ समोर येताच, लोकांच्या मनात प्रश्नांची एकच गर्दी उसळली. अनेकांचं असं मानणं आहे की, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या कुटुंबांमधील सर्व वाद आता मिटले आहेत. तर काहींच्या मते, पलाश आणि स्मृती यांच्यातील दुरावा आता संपुष्टात आला असून त्यांच्यात पुन्हा सलोखा निर्माण झाला आहे. दरम्यान, काही सोशल मीडिया युजर्सनी मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा केलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Daisy Shah On Palaash Muchhal, Smriti Mandhana: 'पलाश-स्मृती क्युट कपल, त्यांच्यात पुन्हा...'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या