Smart Sunbai Marathi Movie Trailer launch: मराठी चित्रपटसृष्टीत नव्या उत्साहाची लाट निर्माण करत स्मार्ट सुनबाई’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.  (Trailer launch)आकर्षक दृश्यरचना, प्रभावी संवाद आणि नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी कथा या ट्रेलरमधून झळकते. महाराष्ट्रीय सण-उत्सवांच्या रंगांनी सजलेलं वातावरण, रहस्याची झलक, कौटुंबिक विनोद आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना कधी हसवते तर कधी विचार करायला लावते. (Marathi Movie)

Continues below advertisement

रोमँटिक गीतांचा गोडवा, दमदार कथानक 

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, तसेच कार्तिक दोलताडे पाटील सहनिर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. चित्रपटातील रोमँटिक गीतांचा गोडवा या कथेला नव्या रंगात रंगवतो आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं भावविश्व निर्माण करतो. हलका फुलका विनोद, रहस्य आणि कौटुंबिक नात्यांच्या गुंतागुंतीच्या वातावरणातही या सुरेल गाण्यांनी प्रेम आणि भावना यांची एक सुंदर छटा निर्माण केली आहे. प्रत्येक गाणं हे कथानकाच्या प्रवाहाशी घट्ट जोडलेलं असून, ते पात्रांच्या भावनांना अधिक खोली देतं.

Continues below advertisement

चित्रपटाची कथा आणि पटकथा लेखक योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारली असून, संगीतकार विजय नारायण गवंडे आणि साई-पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजाने सजलेली ही संगीतमय मेजवानी ‘स्मार्ट सुनबाई’ला एक वेगळीच ओळख देणार आहे.

लोकप्रिय कलाकारांची फळी एकत्र 

‘स्मार्ट सुनबाई’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांची झगमगती फळी एकत्र आली आहे. संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, सायली देवधर, मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर, प्राजक्ता गायकवाड, उषा नाईक, अंशुमन विचारे, स्नेहल शिदम, विनम्र बाबल, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, मोनिका बंगाळ, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार आणि कांचन चौधरी या कलाकारांच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाला भव्यतेची झळाळी प्राप्त झाली आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि स्क्रीनवरील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच मोहून टाकेल.

कौटुंबिक नाती, विनोद, रहस्य आणि भावना यांचा अनोखा संगम असलेला ‘स्मार्ट सुनबाई’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक ताजं, रंगतदार आणि पूर्णतः एंटरटेनिंग अनुभव ठरणार आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, मराठी प्रेक्षकांसाठी ही एक नक्कीच पाहावी अशी कौटुंबिक मेजवानी ठरणार आहे.