Singer Yaseer Desai Mumbai Worli Sea Link Stunt Video: शुटिंगचाच भाग की, जीवघेणा स्टंट? बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मुंबईच्या वरळी सी-लिंकच्या रेलिंगवर जाऊन उभा, Viral Video नंतर चर्चांना उधाण
Singer Yaseer Desai Mumbai Worli Sea Link Stunt Video: सुप्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाईचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक मुंबईतील वरळी सी-लिंकवर निर्भयपणे उभा असल्याचं दिसतंय.

Singer Yaseer Desai Mumbai Worli Sea Link Stunt Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातले काही खळखळून हसवणारे असतात, तर काही संताप देणारे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन लाईक्स मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेकजण कधी कोसळणाऱ्या धबधब्याजवळ जाऊन तर कधी रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्हिडीओ बनवतात. तर, काहीजण चालत्या गाडीवर उभे राहून व्हिडीओ काढतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रसिद्ध गायक मुंबईतील वरळी सी-लिंकच्या रेलिंगवर कोणत्याही सुरक्षेशिवाय किंवा सपोर्टशिवाय उभा राहून व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसतंय.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाई (Playback Singer Yasser Desai) याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक मुंबईतील (Mumbai News) वरळी सी-लिंकवर (Worli Sea Link) निर्भयपणे उभा असल्याचं दिसतंय. त्याचा हा नको ते धाडस करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांकडून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.
यासर देसाईंचा (Yasser Desai) हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेटकरी विचारतायत की, हा धोकादायक स्टंट कोणत्या शूटिंगचा भाग होता की, गायक हा त्याच्या टाईमपाससाठी करत होता? कारण, सी-लिंकवर असं उभं राहणं खूप धोकादायक आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही योग्य नाही. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनीही गायकाच्या या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
वरळी सी-लिंकच्या रेलिंगवर उभा होता प्रसिद्ध गायक
यासर देसाईचा हा व्हिडीओ एका गाण्याच्या शूटिंगचा भाग आहे. यामध्ये तो मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर एका गाण्याच्या शूटिंगसाठी उभा असल्याचं दिसतंय. वांद्रे पोलीस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, व्हिडीओची चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांनी असंही सांगितलं की, आतापर्यंत याबाबत कोणताही एफआयआर अधिकृतपणे नोंदवण्यात आलेला नाही, पण पोलिसांनी व्हिडीओची दखल घेतली आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल.
Singer and songwriter Yasser Desai was seen shooting a video on the railing wires of the Worli Sea Link.
— Kumar Ankit (@Kumar_Ankit03) July 8, 2025
A case has been registered at the Bandra Police Station, and authorities are currently searching for the accused.#Mumbai #Bandra pic.twitter.com/PvPBRnJCFk
सुप्रसिद्ध गायक यासर देसाई कोण?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक यासर देसाईनं आजवर अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. फिल्म 'ड्राईव'मधलं 'मखना', 'सुकून'मधलं 'दिल को करार आया', 'शादी में जरूर आना'मधलं 'जोगी' आणि 'पल्लो लटके' आणि 'गोल्ड'मधलं 'नैनो ने बांधी' यांसारखी हिट गाणी यासरनं गायली आहेत. गायक यासर देसाईनं 2016 मध्ये आलेल्या 'बेईमान लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये गायक म्हणून पदार्पण केलेलं. या चित्रपटात त्यांनी आकांक्षा शर्मासोबत 'मैं अधुरा' ही दोन गाणी आणि सुकृती कक्करसोबत 'मेरे पीछे हिंदुस्तान है' हे दुसरं गाणं गायलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























