Singer Accused on Trisha Krishnan: सुपरस्टार अभिनेता (Superstar Actor) ते तामिळनाडूचा मुख्यमंत्री (Chief Minister of Tamil Nadu), असा प्रवास करणाऱ्या थलपती विजय (Thalapathy Vijay)  यांच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत यश मिळवलं. ज्यावेळी थलपती विजय यांनी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचे चाहते आणि तेलुगू अभिनेत्री तृषा कृष्णन (Telugu Actress Trisha Krishnan) शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या थलपती विजय यांच्यापेक्षाही त्यांच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या तृषा कृष्णन हिची जोरदार चर्चा रंगली. शपथविधी सोहळ्यातले तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले. पण, शपथविधी सोहळ्यातील तृषाची उपस्थिती मात्र, एका प्रसिद्ध गायिकेला चांगलीच खटकली. गायिकेनं यासंदर्भात अगदी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. 

Continues below advertisement

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रसिद्ध गायिका सुचित्रा (Singer Suchitra) हिनं सध्याच्या परिस्थितीबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं आणि आपण थलपती विजयला पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं. पण, यासोबतच गायिकेनं आपल्याला तृषा अजिबातच आवडत नसल्याचं स्पष्टच सांगून टाकलं.'फर्स्टपोस्ट'नं दिलेल्या वृत्तानुसार, गायिका सुचित्रा म्हणाली की, "मला त्रिशा अजिबातच आवडत नाही. मी हे वक्तव्य पूर्णपणे भानावर असताना करतेय आणि याचा माझ्या निर्णयावर कोणताही प्रभाव पडू देणार नाही... मला विजय खूप आवडतो. कोणाचीही बाजू न घेता, मी माझं प्रामाणिक मत मांडेन..."

गायिका सुचित्रानं पुढे म्हटलं की, "यशस्वी लोकांच्या आयुष्यात एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा प्रवेश तेव्हाच होतो, जेव्हा ते एकाकी पडतात. थलपती विजय यानं आपल्या आई-वडिलांपासून आणि पत्नीपासून स्वतःला दूर केलं आहे, ज्यामुळे ते एकाकी पडलेत. याच दरम्यान, त्यानं राजकारणात प्रवेश केलाय. या राजकीय वाटचालीत प्रगती करण्यासाठी त्याला त्याचे वडील चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, अन्यथा, त्याला काहीही साध्य करता येणार नाही..."

Continues below advertisement

थपथविधी सोहळ्यात अभिनेत्री तृषा कृष्णन आणि विजयच्या आईनं एकमेकींना घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यावरूनही गायिकेनं आता तृषावर निशाणा साधला आहे. सुचित्रा म्हणाली की, "घटस्फोट न घेताच थलपती विजय तृषासोबत मुक्तपणे हिंडतोय, फिरतोय. विजय यांचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध (अफेअर) सुरू असल्याचा आरोप त्याची पहिली पत्नी संगीतानं केला आहे..."

सुचित्राने पुढे म्हटलं की, "विजय आपल्या चाहत्यांसमोर एक अत्यंत चुकीचा आदर्श उभा करत आहेत... तर दुसरीकडे, त्यांच्या महिला चाहत्या, त्यानं आपल्या पत्नीसोबत केलेल्या गैरवर्तनाचं आंधळेपणानं समर्थन करत आहेत. इतकंच नव्हे, तर त्या अप्रत्यक्षपणे एका अनैतिक संबंधालाच प्रोत्साहन देत आहेत. सध्या विजय यांची पत्नी आणि मुलं कोणत्या मानसिक अवस्थेतून जात असतील, याची तुम्ही केवळ कल्पनाच करा..."

थलपती विजय यांच्या संसारात मिठाचा खडा? 

विजय यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिनं डिसेंबर 2025 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाची माहिती फेब्रुवारीमध्ये समोर आली, जेव्हा हा खटला चेंगलपट्टू कुटुंब कल्याण न्यायालय इथे सुनावणीसाठी आला. मिडिया रिपोर्टनुसार, संगीता हिनं आपल्या याचिकेत तब्बल 27 वर्षांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्यामागे तिची झालेली फसवणूक आणि मानसिक छळ ही कारणं नमूद केली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Joseph Vijay And Trisha Krishnan: विजय थलपती यांच्या शपथविधी सोहळ्याला रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाची एन्ट्री होताच काय घडलं?, सगळ्याचं लक्ष वेधलं, PHOTO