Salim Kodathur fairness Cream problem: गायक आणि संगीतकार सलीम कोड़ाथूर (Salim Kodathur) यांनी रविवारी मोठा खुलासा केला. त्याने केलेला खुलासा ऐकून अनेकांना धक्का बसला. 10 वर्षांपूर्वी मित्राच्या सल्ल्यानुसार, फेअरनेस वाढवणारी क्रिम (Fairness cream) वापरल्यानंतर त्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. काही महिन्यांतच त्याच्या पापण्या आणि पाय सुजले होते. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. PTIच्या रिपोर्टनुसार, सलीमने पत्रकारांना सांगितले होते की, डॉक्टरांच्या तपासणीत गायकाची ही स्थिती एल्ब्यूमिनची (एक महत्वपूर्ण प्रोटीन) पातळी कमी असल्यामुळे झाल्याचे निदान झाले आहे. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, प्रोटीनची पातळी कमीच राहिली तर किडनी निकामी होऊ शकते.
फेअरनेस क्रीम ठरली गायकाच्या आरोग्यासाठी घातक (Salim Kodathur Reveals Serious Health Complications after use of cream)
गायकाने सांगितले की, किडनी बायोप्सीनंतर त्याला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी' (membranous nephropathy) असल्याचं निदान झाले. या आजाराच्या उपचारासाठी गायक बरीच महिने रुग्णालयात होता. सलीमने सांगितले की, त्याने ही क्रिम 500 रुपयांत विकत घेतली होती. एक वर्षाहून अधिक काळ त्याने ही क्रिम वापरली होती. आरोग्याच्या निगडीत समस्या अजूनही त्याला छळत आहे. विशेषत: झोपेच्या समस्या अजूनही सतावत आहे. गायक म्हणाला की, 'मी दिवसातून केवळ 2 ते 3 तास झोपू शकतो. काही दिवसानंतर मला झोपेसाठी गोळ्या घ्यावे लागल्या', असा खुलासा सलीम कोड़ाथूर याने केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फेअरनेस क्रिम वापरणाऱ्या का 17 वर्षीय तरुणीलाही अशीच समस्या जाणवली होती. मलप्पुरम येथील एस्टर MIMS मदर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मते, 'त्या तरुणीने इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सचे प्रमोशनल व्हिडिओ पाहून क्रिम मागवली होती. तसेच ती क्रिम वापरली होती. यात दावा करण्यात आला होता की, ही क्रिम मुरुमे, काळे डाग आणि पिगमेंटेशन काढून टाकेल'. यानंतर त्या तरुणीला गंभीर आजाराच्या संबंधित समस्या जाणवू लागल्या. तिचा अचानक ब्लड प्रेशर अचानक कमी झाला. तसेच तिचे पायही सुजले होते.
गायक सलीमनेही सांगितले की, त्याला देखील अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. यामुळे गायक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर झाला होता. यामुळे त्याला आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले. परिणामी त्याचे प्रचंड नुकसान झाले होते. माहितीनुसार, त्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, वापरलेल्या क्रिमचा नमुनाही तिने पोलिसांना दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
