Palash Muchhal in Trouble After 40 Lakh Cheating Allegations: गायक पलाश मु्च्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचा विवाह होणार होता. मात्र, लग्न होण्यापूर्वीच त्यांचे काही कारणास्तव मोडले. तेव्हापासून दोघांची चर्चा होती. अलिकडेच पलाश मुच्छलला नव्या प्रोजेक्टमध्ये काम मिळाले असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, आता त्याचं पुन्हा एकदा नाव चर्चेत आलं आहे, आणि चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे फसवणूक. त्याच्यावर सांगलीतील एका युवकाने 40 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा युवक स्मृती मानधनाचा बालमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचा विवाह मोडल्यानंतर हे फसवणुकीचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणानंतर युवकाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विज्ञात माने असे पलाश मुच्छवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या युवकाचे नाव आहे. विज्ञान माने हा स्मृती मानधनाचा बाल मित्र असल्याची माहिती आहे. विज्ञान माने हा सांगलीतील रहिवासी असून, तो लहानपणी स्मृतीसोबत क्रिकेट खेळत होता. तो सध्या फिल्म फायनान्सर म्हणून कार्यरत आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांनी पलाश मुच्छल आणि विज्ञान मानेशी ओळख करून दिली होती. याच ओळखीच्या आधारे पलाशनं विज्ञानला 'नजरिया' या चित्रपटात गुंतवणूक करण्यास सांगितले. पलाशनं सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर गुंतवलेली रक्कम पुन्हा मिळेल, असे आश्वासन दिले होते.
पलाशने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून विज्ञानने 40 लाख रूपये गुंतवले. त्यानं पलाशला रोख तसेच काही रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे दिली. मात्र, संबंधित चित्रपटाचे काम अर्धवट राहिले. ते वेळेत पूर्ण झाले नाही. त्यानंतर विज्ञानने पलाशला आपली गुंतवलेली रक्कम पुन्हा मागितली. मात्र, पलाशने रक्कम देण्यास टाळले. तसेच विज्ञानला सतत असमाधानकारक उत्तरे दिले. काही दिवसानंतर पलाशने विज्ञानचे फोन उचलणेही टाळले.
यानंतर विज्ञानने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानं सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित प्रकरणातील काही व्यवहारांचे फोटोही त्यानं तक्रारीसोबत जोडले आहेत. या प्रकरणावर पोलीस प्रशास नेमकं काय पाऊल उचलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, या प्रकरणानंतर पलाश मुच्छल किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.