Bollywood Singer Music Composer Pritam Likely Get Retirement: प्रसिद्ध संगीतकार (Music Composer) आणि गायक (Bollywood Singer) प्रीतम चक्रवर्ती (Pritam Chakraborty) सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या एका गूढ पोस्टमुळे चाहते पुरते हैराण झाले आहेत. बॉलिवूड (Bollywood News) आणि त्यातल्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला प्रीतम चक्रवर्ती म्हणजे, आनंदाची पर्वणी. पण, आता हेच नाव इंडस्ट्रीपासून दूर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंह (Singer Arijit Singh) यानं काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधून निवृत्ती (Retirement From Bollywood) घेत असल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना धक्का बसला. अशातच आता प्रीतम यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे तेसुद्धा बॉलिवूडपासून दूर जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

Continues below advertisement

14 जून रोजी आपल्या 55 ​​व्या वाढदिवसानिमित्त, प्रीतमनं इन्स्टाग्रामवर काही ब्लॅक-अँड-व्हाइट फोटो शेअर केलेत आणि त्यासोबतच बदलत्या प्राधान्यक्रमांविषयी आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली स्वप्न पूर्ण करण्याविषयी एक मेसेजही लिहिला. या संगीतकारानं निवृत्तीचा स्पष्ट उल्लेख केला नसला, तरी अनेक चाहत्यांनी त्याच्या या वक्तव्याचा अर्थ असा लावलाय की, ते कदाचित बॉलिवूड प्रकल्पांतून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा विचार करत असावेत. प्रीतम यांच्या त्या सविस्तर पोस्टमधील "वेगळ्या पद्धतीनं जगण्याला प्राधान्य देण्याबाबतच्या उल्लेखानं त्यांच्या निवृत्तीच्या अफवांना अधिकच बळ मिळालंय.

प्रीतम यांची इन्स्टावरची 'ती' पोस्ट काय? (Music Composer Pritam Insta Post)

Continues below advertisement

प्रीतम यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की, त्यांना त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं जगायचंय. एक असं आयुष्य जे त्यांना नेहमीच आकर्षित करत आलंय, पण काहीतरी हातातून सूटत होतं. पण आता त्यांना त्या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायचंय, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या पोस्टमुळे प्रीतम चक्रवर्ती पार्श्वगायनातून ब्रेक घेणार का? असे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. 

प्रीतम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की,"तुमच्या सर्व शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. मी प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उत्तर देऊ शकत नाही, म्हणून कृपया माझे आभार स्वीकारा. आज, मी स्वतःला काही वर्षांची भेट देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मी आयुष्य नव्यानं जगू शकेन. ज्या गोष्टी मी आतापर्यंत करू शकलो नाही, त्या पूर्ण करण्यासाठी. ज्या नवीन गोष्टींना मी खूप काळापासून पुढे ढकलत होतो, त्यांना सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. नेहमीच्या वाटेवरून चालणं हा देखील एक अद्भुत अनुभव असतो. पण मला नेहमीच अज्ञात वाटांबद्दल अधिक उत्सुकता वाटली आहे. तुमच्या सर्व प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. सदैव...", अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. 

जुन्या मुलाखतीत केलेला निवृत्ती घेण्याचा उल्लेख 

एका आधीच्या मुलाखतीत बोलताना प्रीतम यांनी सांगितलेलं की, अरिजित सिंह याच्या निर्णयामुळे त्यांना निवृत्ती घेण्याच्या स्वतःच्या प्लानचा पुनर्विचार करण्यास प्रेरणा मिळाली. त्यांनी त्याच मुलाखतीत बोलताना नमूद केलेलं की, मुख्य प्रवाहातील कामातून बाजूला होण्याचं धाडस एकवटण्याचा तो बराच काळापासून प्रयत्न करत होता, मात्र अरिजित सिंह यानं केवळ आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि कोणताही संकोच न बाळगता तो निर्णय घेतला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ravi Kishan On Sanchita Ugale Death Case: '...त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही'; संचिता उगलेनं उचललेल्या टोकाच्या पावलावर रवि किशन नेमकं काय म्हणाले?

ABP Majha च्या बातम्या LIVE