Sikandar Box Office Collection: दबंग भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर'ची (Sikandar Movie) चाहते आतुरतनेनं वाट पाहत आहेत. या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. नुकताच 'सिकंदर'चा (Sikandar) धमाकेदार ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला. ज्यामुळे आता 'सिकंदर'बाबत चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, ज्यावेळी सलमान खानला 'सिकंदर'च्या यशाबाबत विचारलं, त्यावेळी त्यानं दिलेल्या उत्तरानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
'सिकंदर' किती कमावणार? सलमानची थेट भविष्यवाणी
दबंग भाईजान सलमान खाननं 'सिकंदर'मधली त्याची को-अॅक्टर रश्मिका मंदानासोबत मुंबईतील ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली. या कार्यक्रमात, 2025 च्या ईदला प्रदर्शित होणाऱ्या 'सिकंदर' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील आकड्यांबाबत विचारल्यावर सलमान खाननं खळखळून हसत एक वक्तव्य केलं. तो म्हणाला की, चित्रपटाचा दर्जा काहीही असो, त्याचे चाहते नेहमीच त्याचा चित्रपट 100 कोटींचा आकडा ओलांडण्यासाठी मदत करतात. सलमान खाननं त्याच्या चाहत्यांवर दाखवलेला विश्वास पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सलमान खान म्हणाला की, "ईद, दिवाळी, नवं वर्ष, फेस्टिव, नॉन फेस्टिव - हे लोकांचं प्रेम आहे. चित्रपट चांगला असो वा वाईट, तो 100 कोटींचा टप्पा ओलांडतोच... 100 कोटी रुपये पूर्वीची गोष्ट होती, आता 200 कोटी रुपये झाली आहे."
सलमान रश्मिकामध्ये 31 वर्षांचं अंतर
'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान आणि रश्मिका यांच्यात असलेल्या 31 वर्षांच्या अंतराबद्दल चर्चा सुरू आहेत. यावरही सलमान खाननं भाष्य केलं आहे. सलमान खान म्हणाला की, तो त्याच्या फिटनेससाठी कठोर परिश्रम घेत आहे. तरीसुद्धा लोक वयातील अंतराबाबत प्रश्न उपस्थित करत असतात. पुढे म्हणाला की, "नंतर ते म्हणतात की, 31 वर्षांचं अंतर आहे, हिरोईन आणि माझ्यात, अरे पण जर हिरोईनला काही त्रास नाही, तिच्या वडिलांना कोणताही त्रास नाही, मग तुम्हाला एवढा त्रास का होतोय? तिचं लग्न झाल्यानंतर, तिच्या मुलीसोबतही मी काम करेल, तिच्या आईची परवानगी तर मिळेलच..."
'सिकंदर' कधी रिलीज होणार?
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' 30 मार्च 2025 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान एका अॅक्शन-हिरोच्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. 3 मिनिटं आणि 39 सेकंदांचा हा ट्रेलर अॅक्शनने भरलेला थ्रिलर आहे.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :