Toxic Kiara Advani Scene: यशच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. खरंतर, ट्रेलर येण्याच्या आधीपासूनच कियारा आणि यशच्या इंटीमेट सीनची, बोल्ड सीन्सची चर्चा रंगलेली. अनेकांनी कियाराच्या लूकचं कौतूक केलं असलं तरी इंटिमेट, बोल्ड सीन्सवरून होणाऱ्या चर्चेचा रोख नंतर सिद्धार्थ मल्होत्राकडे (Siddharth Malhotra) वळला. अनेकांनी सिद्धार्थ मल्होत्राला टॅग करत प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. कियाराच्या बोल्ड लुकनंतर यश आणि कियाराच्या केमिस्ट्रीची एकच चर्चा रंगली. दरम्यान, या सगळ्यात आता कियारा आणि तिच्या कामावर पती सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली आहे.
यशच्या ‘टॉक्सिक’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये केवळ यशच नाही, तर कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. कलाकारांच्या अभिनयाचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई करेल, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. मात्र, कियारा तिच्या इंटिमेट सीन्समुळे विशेष चर्चेत आली. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रावरही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले.
ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया
‘टॉक्सिक’मध्ये कियाराचा इंटिमेट सीन पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर ट्रोलिंग सुरू झाली. यानंतर काही युजर्सनी सिद्धार्थ मल्होत्रालाही लक्ष्य केलं. या चर्चेदरम्यान सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर कियारा आणि ‘टॉक्सिक’साठी खास पोस्ट शेअर केली.सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “तुझी मेहनत, आणि तुझी जिद्द हे सगळं मोठ्या पडद्यावर दिसेल. हा तुझ्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक असेल, Ki!”
पुढे गीतू मोहनदास यांचं कौतुक करत सिद्धार्थने लिहिलं की, यश, कियारा आणि संपूर्ण टीमने मिळून तयार केलेलं हे जग पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. त्याने संपूर्ण टीमला शुभेच्छा देत 26 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत असल्याचं म्हटलं. कियारा आणि यशच्या केमिस्ट्रीची चर्चा सुरू असतानाच सिद्धार्थची ही पोस्ट समोर आली. विशेषतः ट्रेलरमधील इंटिमेट सीन्समुळे दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते.
कियाराच्या इंटिमेट सीन्सवर यशने काय म्हटलं?
दरम्यान, ‘टॉक्सिक’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये यशनेही कियाराच्या इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं होतं. यशने सिनेमातील सर्व कलाकारांचं कौतुक करत त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांमध्ये पूर्णपणे शिरून काम केल्याचं सांगितलं. कियाराबद्दल बोलताना यश म्हणाला की, प्रेक्षकांनी सध्या फक्त एक झलक पाहिली आहे. कियाराने ‘टॉक्सिक’साठी खूप मेहनत घेतली असून, तिने आपल्या भूमिकेसाठी मोठ्या समर्पणाने काम केलं आहे. यशने पुढे कियाराचं कौतुक करत सांगितलं की, एखाद्या कलाकाराने ज्या गोष्टीवर विश्वास आहे, त्यावर ठाम राहून काम करावं. लोक नक्कीच त्याचं कौतुक करतील. “फक्त एवढंच आहे की, आम्ही आमच्या काळाच्या थोडं पुढे चाललो आहोत,” असंही यशने म्हटलं.
‘टॉक्सिक’मध्ये कियाराची भूमिका काय?
‘टॉक्सिक’मध्ये कियारा अडवाणी नादिया ही भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे. कियारा आणि गीतू यांची एकत्रित काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर यशसोबतही कियारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. या सिनेमात नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.‘टॉक्सिक’ हा सिनेमा 26 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा सिनेमा 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार होता. मात्र, आखाती युद्ध आणि ‘धुरंधर 2’च्या रिलीजमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
