Siddharth Malhotra father death: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या मोठ्या दुःखातून जात आहेत. त्यांच्या वडिलांचे, सुनील मल्होत्रा यांचे नुकतेच निधन झाले. ही बातमी समजताच सिद्धार्थ पत्नी कियारा अडवाणीसोबत तातडीने दिल्लीला पोहोचला. कुटुंबियांच्या उपस्थितीत त्याने वडिलांना अखेरचा निरोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराच्या सर्व विधी पार पडले असून सिद्धार्थ आणि कियारा सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. वडिलांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते असल्याने हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरत आहे.
वडिलांशी खास नातं
सिद्धार्थ मल्होत्रा अनेक मुलाखतींमध्ये वडिलांबद्दल मोकळेपणाने बोललेला. त्यांनी एकदा म्हटलं होतं, “माझे पापा हेच माझे खरे हिरो आहेत.” तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे सपोर्ट सिस्टम वडिलांनाच मानत होता. सुनील मल्होत्रा हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. त्यांनी सिद्धार्थला शिस्त, मेहनत आणि जमिनीवर राहण्याची शिकवण दिली.
सिद्धार्थची हृदयस्पर्शी पोस्ट
सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, त्यांच्या वडिलांकडे प्रामाणिकपणा, सचोटी आणि सुसंस्कृतपणा यांचा अद्भुत संगम होता. “कठोरता नसलेली शिस्त, अहंकार नसलेली ताकद आणि प्रत्येक संकटातही सकारात्मक राहण्याची वृत्ती” अशा शब्दांत त्याने वडिलांचे व्यक्तिमत्त्व वर्णन केले.
मर्चंट नेव्हीचे कॅप्टन म्हणून समुद्राची जबाबदारी सांभाळण्यापासून ते आजाराशी शांत धैर्याने लढण्यापर्यंत त्यांनी कधीही तडजोड केली नाही, असेही सिद्धार्थने नमूद केले. स्ट्रोकनंतर व्हीलचेअरवर येऊनही त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द कायम होती, असे त्यांनी सांगितले.
पोस्टच्या शेवटी सिद्धार्थने भावुक होत लिहिले, “पापा, तुमची सचोटी ही माझी वारसा आहे.तुमची ताकद मला दररोज मार्ग दाखवते. तुमची सकारात्मकता आजही आमच्या कुटुंबाला जोडून ठेवते. मी जे काही आहे, ते तुमच्यामुळेच आहे.लव्ह यू पापा.”
कोणत्या आजाराने झाले निधन?
सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या वडिलांचे निधन दीर्घ आजारामुळे झाले. त्यांना स्ट्रोक आला होता आणि ते काही काळापासून पॅरालाइज्ड होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. या आजारांमुळेच त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.
करिअरची सुरुवात आणि ओळख
सिद्धार्थने 2012 मध्ये स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर एक विलन, शेरशहा आणि मिशन मजनू अशा चित्रपटांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः ‘शेरशाह’मधील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. दरम्यान, 2023 मध्ये सिद्धार्थने कियारा आडवाणीशी लग्न केले होते. या दुःखाच्या प्रसंगी चाहत्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे.
