Siddharth Jadhav Filmfare Award For Aata Thambaycha Naay Movie: नुकताच 11 वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार (FilmFare Award) सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या सोहळ्यानिमित्त (FilmFare Award Night Show) बड्या कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. या खास सोहळ्यात मराठी कलाकारांचा गौरव करण्यात आला. शिवराज वायचळ दिग्दर्शित 'आता थांबायचं नाही' (Aata Thambaycha Naay) या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 2025 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव सारखे जबरदस्त कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला सर्वाधिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही (Siddharth Jadhav) पुरस्कार मिळाला आहे. त्याने पुरस्कार मिळाल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.
'आता थांबायचं नाही' या चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधवचं पुरस्कार देऊन गौरव (Siddharth Jadhav Wins Filmfare Award for Aata Thambaycha naay)
'आता थांबायचं नाही' हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आले. 'आता थांबायचं नाही' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, दिग्दर्शिक, डॉयलॉग, संगीत, गायक आणि सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्काराने गौरवण्यात आले. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सर्व टीमचे कौतुक करण्यात आले. या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेता म्हणून अभिनेता सिद्धार्थ जाधवचा विशेष सन्मान करण्यात आला.
सिद्धार्थ जाधवचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर अभिनेत्याने खास पोस्ट आपल्या अधिकृत सोशस मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या फोटोत सिद्धार्थ जाधव बेडवर असून, त्याच्या शेजारी ब्लॅक लेडी अर्थात फिल्मफेअरचा अवॉर्ड आहे. एका फोटोमध्ये सिद्धार्थ फिल्मफेअर पुरस्काराकडे पाहत आहे. सिद्धार्थ या फोटोंमध्ये प्रचंड आनंदित दिसत आहे. त्याने फोटो शेअर करुन खास लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे.
सिद्धार्थ जाधवने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'सुपरहॅपी....wowowowowo..थँक्स फिल्मफेअर.. 'आता थांबायचं नाही' या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्यासाठी पुरस्कार. 'आता थांबायचं नाही' या टीमचे मनापासून आभार. लव्ह यू फॉरेव्हर'. सध्या सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर दिग्गज कलाकारांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. गौरव मोरे, प्रिया बापट, कुशल बद्रिके, भाग्यश्री मोटे यांसह इतर दिग्गज कलाकार आणि चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
