Sade Made Teen : अंकुश चौधरी (Ankush Choudhary) दिग्दर्शित 'साडे माडे तीन' हा सिनेमा 17 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि अशोक सराफ या कुरळे ब्रदर्सनी प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडली. त्यामुळे आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस उतरतो. त्यातच काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सिक्वेलचीही घोषणा झाली होती.

Continues below advertisement

नुकतच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला असून सिनेमाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. सिद्धार्थ जाधवनेही या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या सिक्वेलमध्येही सिद्धार्थ झळकणार आहे. नुकतीच सिनेमाच्या स्टारकास्टसोबतचा फोटो त्याने शेअर केला असून अनेक नवे कलाकार यामध्ये दिसयात. 

सिद्धार्थने शेअर केला फोटो

 दरम्यान सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता संकेत पाठक आणि रिंकु राजगुरुही दिसत आहेत. त्याचप्रमाणे या फोटोमध्ये मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि अशोक सराफ ही मंडळी देखील दिसतायत. तसेच अंकुश चौधरी आणि संजय जाधवही दिसत आहेत. अंकुश पुन्हा एकदा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळतोय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिलीये. 

Continues below advertisement

पोस्टमध्ये सिद्धार्थने काय म्हटलं?

सिद्धार्थने ही पोस्ट शेअर करत म्हटलं की, "पुन्हा एकदा साडे माडे 3" "पुन्हा एकदा" महाराष्ट्रातल्या " MEGA SUPERSTARS"बरोबर काम करायचा योग .. "पुन्हा एकदा" जुन्या मित्रांबरोबर नविन काम "पुन्हा एकदा" संजय जाधव सरांच्या नजरेतून दिसण्याच्या योग. "पुन्हा एकदा"  अंकुश चौधरी सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी आणि "पुन्हा एकदा" मायबाप रसिकांना आनंद देण्याचा घेतलेला वसा... 

'साडे माडे तीन' हा चित्रपट हिंदीत गाजलेल्या 'चलती का नाम गाडी' या चित्रपटाचा रिमेक होता. 'साडे माडे तीन' हा चित्रपट त्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक होता. त्यानंतर आता सिनेमाच्या सिक्वेलच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे.  'पुन्हा एकदा साडे माडे तीन' मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे 'साडे माडे तीन'मधील कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : आर्याची हकालपट्टी, आता आणखी एका सदस्याची होणार एक्झिट; रितेश भाऊ घरात येऊन करणार नाव जाहीर