प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वडिलांचं छत्र हरपलं, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शुभम जाधवची हळवी पोस्ट
Shubham Jadhavs Heartfelt Tribute to Father: रिलस्टार शुभम जाधवच्या वडिलांचे निधन झाले. शुभमने भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला.

Shubham Jadhav shares emotional tribute after father Nitin Jadhavs death: रिलस्टार प्रथमेश कदमची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. अनेकांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केलं. दरम्यान, प्रथमेश कदमच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका प्रसिद्ध रिलस्टारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध रिलस्टार शुभम जाधवच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यानं पोस्ट शेअर करुन आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी शेअर केली. शुभम जाधवने वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली. त्यानं कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याच्या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या आयुष्यात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
शुभम जाधव हा रिलस्टार असून, त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यानं आपल्या रिल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलं. दरम्यान, त्याच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले आहे. शुभम जाधवचे वडील नितीन जाधव यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्यावर नेमकं कोणत्या आजारावर उपचार सुरू होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शुभमच्या वडिलांच्या निधनानंतर त्यानं आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची संपूर्ण फॅमिली दिसत आहे. त्यानं वडिलांचे रुग्णालयातील उपचारादरम्यानचे फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, रुग्णालयातील फोटोंवरून ते कोणत्यातरी गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शुभमच्या या पोस्टवर मराठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काही कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शुभमचे सांत्वन केले.
View this post on Instagram
शुभमने फोटो शेअर करुन एक भावनिक कॅप्शन दिलं आहे,'Rest in pappa... तुम्ही खूप लवकर गेलात..', असं म्हणत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:

























