Shrirang Godbole On Marathi Language Controversy: बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra News) एक मुद्दा गाजतोय, तो हिंदी सक्ती (Hindi Compulsory) नको... मराठी हवीच... मराठीसाठी (Marathi Language Row) सर्वसामान्य माणसांपासून ते अगदी राजकीय नेत्यांपर्यंत (Politicle Party) सारेच एवटले आहेत. अर्थात, याची सुरुवात झाली आणि प्रकरण तापलं ते महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) केंद्राच्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करत त्रिभाषा सूत्र धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आणि मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला. मग अनेक ठिकाणी हिंदी-मराठी वाद (Hindi-Marathi Debate) उफाळून आले. वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट करत, महाराष्ट्रात मराठीच... दुसरं काहीच नाही, अशी ठाम भूमिका मांडली. अशातच आता दिग्गज मराठमोळे निर्माते, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनीही अगदी सहज, सोप्या शब्दांत आपली ठाम भूमिका मांडली आहे. 'लल्लनटॉप'शी बोलताना श्रीरंग गोडबोले यांनी अगदी सोप्या शब्दांत कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण तरीसुद्धा मराठी का हवी? हे समजावून सांगितलं. श्रीरंग गोडबोलेंचा (Shrirang Godbole) हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून श्रीरंग गोडबोलेंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यावेळी ते म्हणाले की, "भारतात विविध भाषा आहेत आणि त्या प्रत्येक भाषेचं सौंदर्य आहे. जसं तुम्ही आडेकर, एलकुंचवार, तेंडुलकर यांची नावं घेतलीत. आम्हीही मोहन राकेश यांची नाटकं केली आहेत, आम्ही साऊथचीही नाटकं केली आहेत. आम्ही आसामी नाटकंही पाहतो, आम्ही संपूर्ण भारतातील नाटकं पाहतो. आम्ही मुन्शी प्रेमचंद, रविंद्रनाथ टागौरांची साहित्य वाचलीत. त्यामुळे भाषेचं आदानप्रदान खूप वर्षांपासून सुरू आहे यात कुणाचं दुमतंही नाही आणि हेच अपेक्षित आहे. मराठी कविता जगभरात पोहोचल्या पाहिजेत. कर्नाटकात भौरप्पा आहे, तर भाषांतर करुन मराठीत आणली पाहिजे... कवितांचं भाषांतर होणं गरजेचं आहे आणि हे होत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. प्रमाण मराठी भाषा सोडून अनेक बोलीभाषा आहेत."
"तुम्ही जे मराठी... मराठी बोलताय... एक मराठी नाहीये, तब्बल 64 मराठी भाषा आहेत, तुम्ही जी म्हणताय ती प्रमाण भाषा आहे... अहिराणी, आगरी, वन्हाडी, अहिराणी, मालवणी यांसारख्या अनेक बोलीभाषांचं सांस्कृतिक सपाटीकरण होत आहे. या भाषा नष्ट होत आहेत. त्याचं कारण सगळा व्यवहार हा प्रमाण मराठीत सुरू आहे. मुंबईचे सगळे व्यवहार हिंदीत सुरू आहेत आणि हे का होत आहे? तर व्यवहाराची भाषाच ती आहे. मुंबईची निर्मिती झाली, 105 हुतात्म्यांमुळे मुंबई महाराष्ट्राची झाली. तरीही मुंबईची भाषा मराठी झाली नाही.", असं श्रीरंग गोडबोले म्हणाले.
हो मराठी माणसाला कमी लेखलं जातंय : श्रीरंग गोडबोले
"मुंबईनं मराठीला घाटी म्हटलं... एक मराठी असल्याच्या नात्यानं मी अगदी विचारपूर्वक सांगतो की, माझ्या मनात, माझ्या डोक्यात असं आहे का? की, मराठीला कमी लेखलं जातंय, तिचं अस्तित्व मिटवलं जातंय... का? तर हो... हे होतंय. याच दृष्टिकोनातून जर महाराष्ट्रात हिंदी सक्ती होत असेल, तर आम्हाला त्याचं दुःख आहे... मी शाळेत असताना मराठीसह हिंदी, इंग्रजी व संस्कृत शिकलो. मी गुजरातीही शिकलो... कारण मुंबईत राहत असल्यानं माझे अनेक शेजारी गुजराती होते. मला कोकणी भाषासुद्धा आवडते, मी तीसुद्धा बोलतो. त्याशिवाय मी जर्मन भाषाही शिकलो आहे."
श्रीरंग गोडबोले म्हणाले की, "एक मराठी म्हणून मी माझ्या मनात मराठीला कमी लेखलं जात आहे का? हा विचार येतो आणि त्यावर मी विचारपूर्वक सांगतो की, हो... हे होत आहे. याच दृष्टिकोनातून जर महाराष्ट्रात हिंदी सक्ती होत असेल, तर आम्हाला त्याचं दुःख होत आहे. मी शाळेत असताना मराठीसह हिंदी, इंग्रजी व संस्कृत शिकलो. मग मुंबईत राहत असल्यानं माझे अनेक शेजारी ही गुजराती होते, त्यामुळे मी ती भाषासुद्धा शिकलो. मला कोकणी भाषासुद्धा आवडते, मी तीसुद्धा बोलतो. त्याशिवाय मी जर्मन भाषाही शिकलो आहे. मला कोणत्याही भाषेचा त्रास नाही किंवा प्रॉब्लेम नाही..."
आम्हाला हिंदीबद्दल काही प्रश्न नाही, प्रश्न त्या विषयाच्या सक्तीचाय : श्रीरंग गोडबोले
"मुद्दा इतकाच आहे की, तुम्ही त्रिभाषा सूत्रानुसार, हिंदी भाषेची सक्ती का करत आहात? आम्हाला मंटो आवडतो, प्रेमचंद आवडतात. आम्हाला हिंदी साहित्य आवडतं. हिंदी सिनेमा आवडतो. हिंदी संगीतही आवडतं. आमच्या लता मंगेशकरांनी बहुतांश हिंदी गाणीच गायली आहेत. त्यामुळे आम्हाला हिंदीबद्दल काही प्रश्न नाही, प्रश्न त्या विषयाच्या सक्तीचा आहे.", असं श्रीरंग गोडबोले म्हणाले.
पुढे बोलताना श्रीरंग गोडबोले म्हणाले की, "तुम्ही या सगळ्याला राजकारण म्हणत असाल, तर मग हे राजकारण आजचं नाही किंवा जर तुम्ही म्हणत असाल की, हा राजकीय प्रश्न आहे, तर हा फक्त राजकीय प्रश्न नाही. आणि तसं असेल तर हे राजकारण आजचं नाही... राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे... हा मराठीचा मुद्दा राजकारणाच्याही पलीकडचा आहे. भाषावार प्रांतरचना झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळं करण्याचा विचार होता, तेव्हापासून हे सुरू आहे. मराठी लोकांसाठी हा भावनिक मुद्दा आहे. याला राजकीय प्रश्न मानू नका."
"राजकारणाला बाजूला ठेवून तुम्ही एखाद्या सामान्य मराठी माणसाला हा प्रश्न विचाराल की 'हिंदी सक्ती योग्य आहे की अयोग्य? तर सगळेच ते चूक असल्याचं सांगतील. तुम्ही सक्ती का करत आहात? तिसरी भाषा म्हणून जर मला वाटतं की, मी संस्कृत शिकावं. तर ते का होऊ नये? पण आता तुम्ही म्हणाल, त्यासाठीचे शिक्षक आपल्याकडे नाहीत. त्याच्यासाठीच्या पायाभूत सुविधा नाहीत. पुस्तके नाहीत. मग तुम्ही हा निर्णय आणायलाच नको. तुम्ही या सगळ्याचा विचार करा, मग तुम्ही सक्ती करा. त्यामुळे मी या सक्तीच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि यात कोणतंही राजकारण नाही.", असं श्रीरंग गोडबोले म्हणाले.
इलेक्शनसाठी मुद्दा बनवला जातोय, असं तुम्हाला वाटतंय, तर ही संधी तुम्हीच दिलीय : श्रीरंग गोडबोले
"जर न्यूनगंड हा विषय असेल तर, मराठी सिनेमाला हिंदी सिनेमासोबत द्वंद्व लढावं लागतं, तेसुद्धा मुंबईत... संपूर्ण महाराष्ट्रात. बिझनेसमध्ये मराठी माणसाला चिरडलं जातंय, तर हे खरंच आहे. आता म्हटलं जातंय की, व्यापारी म्हणाले आम्ही मराठी बोर्ड लावणार नाही... मग हे चुकीचं नाही का? सुप्रीम कोर्टानं त्यांना म्हटलं की, तुम्हाला लिहायला अडचण काय? इथपर्यंत आलात, त्यापेक्षा लिहायला हवं होतं... पण हा मार्ग काढण्याचा मुद्दा झाला... मी सांगतो की, त्यांनी मराठीत बोर्ड लावणं योग्य आहे... मी सांगतोय तुम्हाला की, मराठी माणूस काय विचार करतोय... मला खूप दुःख होतं हे ऐकून की, हे राजकारण आहे... येणाऱ्या इलेक्शनसाठी मुद्दा बनवला जातोय... पण ही संधी तुम्हीच दिलीय... पण भावना मात्र आमच्याही त्याच आहेत.", असं श्रीरंग गोडबोले म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
