Continues below advertisement

Shreyas Talpade: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 6ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.. या शोबाबत घोषणा होताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. या सिझनच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. तर, या शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी समोर आली आहे. मागच्या म्हणजेच बिग बॉस सिझन 5 मध्ये सुप्रसिद्ध रिल स्टार सुरज चव्हाण याने ट्रॉफी जिंकली. या सिझनची ट्रॉफी नेमकं कोण घरी घेऊन जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, बिग बॉस सिझन 6 मध्ये एक मराठी कलाकार देखील सहभाग घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कलाकाराने फक्त मराठीच नसून, हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा डंका गाजवला आहे. तो कलाकार नेमका आहे तरी कोण? जाणून घेऊयात.

बिग बॉस 6 मध्ये कोणता कलाकार, इन्फ्लुएंसर किंवा राजकीय मंडळी या शो सहभाग घेणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण एका नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीपासून, हिंदी सिनेसृष्टी तसेच साऊथ कलाकारांना आपला आवाज देणारा, श्रेयस तळपदे बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याची माहिती आहे. बिग बॉस सिझन 6 मध्ये तो स्पर्धक म्हणून सहभाग घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पिंकव्हिलानं त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर, अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच बिग बॉस सिझन 6मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप श्रेयस तळपदेच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

त्यामुळे श्रेयस तळपदे बिग बॉस सिझन 6 या शोमध्ये दिसणार की नाही? हे लवकरच कळेल. दरम्यान, पिंकव्हिलाची ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरसल होत आहे. त्यांनी ही पोस्ट एक्सक्लुझिव्ह म्हणून शेअर केली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला. तसेच हा सिझन पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढली आहे. तर, काहींनी कमेंट करून, श्रेयस तळपदे बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही, अशी कमेंट केली आहे. दरम्यान, श्रेयस तळपदे बिग बॉस सिझन 6 मध्ये दिसणार की नाही? तो स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार की नाही? हे 11 जानेवारीलाच उघड होईल.

श्रेयसने केवळ मराठीतच नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन वर्षात तो अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2026मध्ये तो आझाद भारत, द गेम ऑफ गिरगिट, वेलकम टू द जंगल या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.