Shraddha Kapoor Viral Dance: बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सिनेमांपेक्षा अभिनेत्री (Entertainment) सोशल मीडियात सक्रीय असते. रिल्स आणि पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री (Actress) नेटकऱ्यांचं मनोरंजन करते. बुधवारी अभिनेत्रीनं एक व्हिडीओ (Viral Video) इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अभिनेत्री मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. श्रद्धा पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या गाण्यावर थिरकत होती. तिच्या डान्सचा व्हिडीओ बॉयफ्रेंड राहुल मोदीने रेकॉर्ड केला. श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात जबरदस्त व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ व्हायरल (Shraddha Kapoors Fun Dance Video)
मायकल जॅक्सनच्या गाण्यावर अभिनेत्री श्रद्धा कपूर निर्धास्तपणे नृत्यकौशल्य सादर करत होती. कॅज्यूअल कपड्यांमध्ये अभिनेत्री मनसोक्त डान्स करत होती. अभिनेत्रीचा डान्स जबरदस्त होता. श्रद्धा कपूरने आपल्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला असे नाचायला लावेल'. व्हिडीओच्या शेवटी अभिनेत्री कॅमेऱ्याकडे पाहून हसते. श्रद्धाचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
श्रद्धाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी क्वीन, श्रद्धा पगलू, अशा प्रकारचे कमेंट्स केल्या आहेत. परंतु, असे देखील काही नेटकरी होते, ज्यांनी श्रद्धाचा डान्स नसून, घरातील विखुरलेल्या वस्तूंकडेही लक्ष दिले. एकाने तर अभिनेत्रीला नाचण्यापूर्वी घरातील पसारा आवरण्याचा सल्ला दिला. एका युझरने, 'घर खूप अस्वच्छ आहे. निदान व्हिडीओ ग्रीन स्क्रीनवर करायला हवा होता', अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर अभिनेत्रीने आपल्या मिश्किल पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. 'डिअर मॉम, रिअल आयडीतून कमेंट करा', श्रद्धाने दिलेली प्रतिक्रिया लोकांची मने जिंकत आहे.
राहुल मोदीने श्रद्धा कपूरचा व्हिडीओ केला शूट (Shraddha Kapoor and Rahul Mody relationship)
व्हिडीओच्या सुरुवातीला राहुल मोदीचा आवाज ऐकू येतो. श्रद्धा डान्स करत असताना तिचा बॉयफ्रेंडही तिथेच होता. श्रद्धा आणि राहुल बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही एकत्र अनेकदा स्पॉट झाले आहेत. दरम्यान, दोघांनी अद्याप अधिकृतपणे या नात्याला दुजोरा दिलेला नाही. बऱ्याचदा दोघेही एकत्र इव्हेंटमध्ये दिसतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या लग्नाचीही अफवा पसरली होती. मात्र, त्यानंतर दोघांकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'दम असेल तर सलमान खानला बॅन करा...'; रणवीर सिंहच्या FWICE प्रकरणात राखी सावंतची उडी, VIDEO
ABP माझाच्या बातम्या LIVE..
