Shraddha Kapoor Kolhapur: अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'ईठा' (Eetha) या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने आणि गाण्याने प्रेक्षकांमध्ये भूरळ घातली आहे. सध्या श्रद्धा कपूर आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. डिसेंबर 2026 मध्ये हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि 'ईठा' या सिनेमाच्या टिमने अलिकडेच कोल्हापूरला हजेरी लावली. कोल्हापूरला (Kolhapur) जाऊन अभिनेत्रीने खास कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. या खास प्रसंगी अभिनेत्रीने लाल रंगाची नऊवारी (Nauvari) साडी नेसली होती. या लाल रंगाच्या साडीत श्रद्धा कपूर सुरेख दिसत होती. यावेळी श्रद्धा कपूरने खास कोल्हापूरकरांशी संवाद साधला. अभिनेत्री भावूक झाली असल्याचं पाहायला मिळालं.
लाल रंगाची नऊवारी अन् केसांत गजरा, श्रद्धा कपूरचा मराठमोळा लूक (Shraddha Kapoor Wins Hearts in a Traditional Nauvari Saree)
श्रद्धा कपूरने खास मराठमोळा लूक केला होता. लाल रंगाच्या नऊवारी साडीत अभिनेत्री सुरेख दिसत होती. तिने आधी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. नंतर खास कोल्हापूरकरांशी संवाद साधला. कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरचे डोळे पाणावली. अभिनेत्री भावूक झाली असल्याचं पाहायला मिळालं. श्रद्धा कपूरने स्टेजवरुन उपस्थितांचे आभार मानले. कोल्हापूरकरांचे आभार मानत अभिनेत्री म्हणाली, 'एवढं प्रेम.. मी तुम्हाला एक सांगू, मी तुम्हा सर्वांना बाहेरुन बघितलं. एवढं प्रेम मला तुम्ही दिलं. माझे डोळे भरून आलेत.खरंच माझं मन ना खूपच भरून आलंय'.
'खरंच तुमचं प्रेम पाहून माझं मन भरुन आलं आहे. आता मला खूप जास्त ओव्हरव्हॅल्मिंग वाटतं आहे. खूप-खूप-खूप जास्त ओव्हरव्हेल्मिंग वाटतंय. आणि मला नाही वाटत की मी इथून जाऊ आता. मला कोणीतरी रूम देणार का आता? खरंच, थँक्यू, थँक्यू सो मच!, असं श्रद्धा कपूर म्हणाली. कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूर भारावली. तिने यावेळी कोल्हापूरकरांकडून मिळालेल्या प्रेमाचे कौतुक केले. अभिनेत्री काही खास फोटोस आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसली होती. तसेच कानात आणि गळ्यात ज्वेलरी घातली होती. अभिनेत्री केसांची वेणी घालून गजरा माळला होता. तसेच नाकात नथ घातली होती. अभिनेत्री या मराठमोळ्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा झाले असून, कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
