Shraddha Kapoor Eetha Teaser: बॉलिवूडची क्यूट गर्ल श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा आगामी सिनेमा 'ईठा' (Eetha) च्या टीझरमुळे चर्चेत आहे. या टीझरमध्ये (Entertainment) श्रद्धा कपूरची वेगळीच जादू पाहायला मिळत आहे. टीझर सोशल मीडियात लीक झाल्यापासून प्रेक्षकांकडून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिनं महाराष्ट्रातील लोककलाकार आणि लावणी नृत्यांगना स्व. विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. तिचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच चढ उतार पाहिले. त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता? हेच या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, 'ईठा' सिनेमाचा टीझर लीक झाल्यानंतर विठाबाई नारायणगावकर यांची कन्या मंगला बनसोडे (Mangala Bansode) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
'ईठा' सिनेमावर मंगला बनसोडे यांची प्रतिक्रिया (Mangala Bansode pay tribute to Vithabai Narayangaonkar)
स्व. विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्रातील महान तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांनी आपलं आयुष्य लोकलेसाठी वाहून दिलं होतं. या सिनेमातून त्यांच्या आयुष्यातील अत्यंत गाजलेली घटना दाखवण्यात आली आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असताना ते आपली कला सादर करत होते. तसेच प्रसूतीनंतरही पुन्हा रंगमंचावर जाऊन त्यांनी आपली कला सादर केली. सत्य घटनेवर आधारीत या सिनेमाचा टीझर पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यांची कन्या मंगला बनसोडे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे.
मंगला बनसोडे यांनी आपल्या पोस्टमधून आई स्व. विठाबाई नारायणगावकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सिनेमाचं विशेष कौतुक केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये 'ईठा' सिनेमाचं पोस्टर आणि आई विठाबाई नारायणगावकर यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझी आई स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटावरील ‘इठा’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. नारायणगावकर व शिवजन्मभूमीसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद बाब !! चित्रपट 28 ऑगस्टपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे'.
'ज्या व्यक्तिमत्त्वाच्या आवाजाने त्या काळात मंत्र्यांच्या गाड्या थांबत होत्या, ज्या व्यक्तिमत्त्वाने पोटात बाळ असताना सुद्धा रंगमंच सोडला नाही आणि त्याच रंगमंचावर कलाकृती सादर करत असताना बाळाला जन्म दिला अशा कलेच्या उपासक स्व. विठाबाई नारायणगावकर यांना खऱ्या अर्थाने ही आदरपूर्वक श्रद्धांजली आहे..' . सध्या मंगला बनसोडे यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म तमाशाच्या वातावरणात झाला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून दिलं. त्यांना आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लक्ष्मण उतेकर हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
