मुंबई : लेखन, दिग्दर्शन यांसारख्या क्षेत्रांसोबतच अभिनयातही आपली छाप सोडणाऱ्या प्रियदर्शन जाधव यानं पुन्हा एकदा त्याचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला आहे. एका वेगळ्या विषयावर त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं भाष्य करण्यात येणार आहे. प्रियदर्शनच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे, "लव सुलभ". 


प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करेल अशा नावासह साकारल्या जाणाऱ्या या  नावाच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ठाणे येथे या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे महापौर नरेश म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी चित्रपटाचं टीजर पोस्टरही लाँच करण्यात आलं. 


खासदार Nusrat Jahan चा टॅट्टू सोशल मीडियावर व्हायरल 


देवी सातेरी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेअंतर्गत प्रभाकर परब यांनी "लव सुलभ" चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून, सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 




"लव सुलभ" हे चित्रपटाचं नाव अतिशय आकर्षक आहे. चित्रपटाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. पण, टीजर पोस्टर पाहिल्यानंतर यातही काहीसा, नव्हे तर बराचसा ट्विस्ट असणार आहे हे लक्षात येत आहे. पोस्टवर दिसणारा मेहंदी असलेला, हातात अंगठी असणारा हात, त्या हातानं भिंतीवर स्त्री-पुरुषाची काढलेली आकृती पाहता कथानकाबाबत उत्सुकता निर्माण होत आहे. त्यामुळं आता हे प्रकरण नेमकं आहे तरीह काय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.