Sholay Movie : भारतीय सिनेमाच्या इतिहासात "शोले" हा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणून ओळखला जातो.  ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केला तर सलीम-जावेद यांनी याची कथा व संवाद लिहिले. अॅक्शन, ड्रामा, मैत्री, बदला, विनोद आणि भावनिक क्षण या सर्वांचा उत्कृष्ट संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपटाची कथा ठाकूर बलदेवसिंग या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. ठाकूर बलदेवसिंगच्या कुटुंबाला  डाकू गब्बर सिंग निर्दयीपणे संपवतो. या साऱ्याचा बदला घेण्यासाठी जय आणि वीरू या दोन गुन्हेगारांना त्याला पकडण्याची सुपारी देतो. जय-वीरूची मैत्री, बसंतीचा बडबड्या स्वभाव, ठाकूरचे संयमित पण सूडाने पेटलेले व्यक्तिमत्त्व आणि गब्बर सिंगचा क्रूर, धूर्त चेहरा हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत.

दरम्यान, या सिनेमात मराठी कलाकारांचंही मोठं योगदान आहे. याबाबत ज्येष्ठ सिनेलेखक दिलीप ठाकूर यांनी भाष्य केलंय. दिलीप ठाकूर म्हणाले, सचिन पिळगावकर, विजू खोटे यांची भूमिका आहे. कला दिग्दर्शक म्हणून राम येडेकर होते. एम एस शिंदे होते. विजू खोटे यांनी किस्सा देखील सांगितला होता. त्यांना शोले सिनेमा  Minerva मध्ये जाऊन पाहावा लागला होता. कारण त्यांची छोटी भूमिका होती. Minerva थिएटरमध्ये सलग तीन वर्षे हा सिनेमा गाजत होता. 

"कितने आदमी थे?" किंवा "ये हाथ मुझे दे दे ठाकुर" यांसारखे संवाद आजही लोकांच्या तोंडावर आहेत. चित्रपटातील अॅक्शन सीन्स, जय-वीरूची मोकळी, विनोदी बोलणी, बसंतीचं नृत्य, आणि गब्बरचे भीतीदायक हास्य – हे सगळं "शोले"ला एक कालातीत दर्जा देतात. तांत्रिकदृष्ट्या देखील हा चित्रपट त्या काळासाठी अत्यंत प्रगत होता. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, गाणी आणि लोकेशन्स यांनी चित्रपटाला वेगळाच भारदस्तपणा दिला.

"शोले"ने केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले नाही तर पुढच्या अनेक दशकांसाठी हा चित्रपट हिंदी सिनेमातील प्रेरणास्त्रोत ठरला. जय-वीरूची मैत्री भारतीय संस्कृतीत मैत्रीचे प्रतीक झाली, तर गब्बर सिंग हा खलनायकाचा आदर्श नमुना ठरला. आजही "शोले" हा फक्त एक चित्रपट नसून एक अनुभव आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीत सदैव स्मरणात राहील.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bachchan Family Biggest Enemy: सलमान खान नाही, 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबीयांचा जानी दुश्मन, बिग बींसोबत फक्त एक फिल्म, तीसुद्धा रिलीज झाली नाही