Shivsena Leader Ambadas Danve Demand Tax Free Raja Shivaji Movie: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या  शौर्य गाथावर आधारीत 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची कथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे.  सध्या बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जोरदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे.  अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने उत्तम कामगिरी केली.  या सिनेमात तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.   सलमान खानच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं.  

Continues below advertisement

'राजा शिवाजी' हा सिनेमा करमुक्त करण्यात यावा - अंबादास दानवेंची मागणी (Ambadas Danve demand tax free status Raja Shivaji movie)

प्रदर्शित झाल्यापासून 'राजा शिवाजी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. अवघ्या तीन दिवसांत या ऐतिहासिक सिनेमाने 37 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल यात शंका नाही.  दरम्यान, अलिकडेच या चित्रपटाविषयी   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक मोठी मागणी केली आहे. 'राजा शिवाजी' हा सिनेमा करमुक्त केला जावा, अशी मागणी केली आहे. 

 अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी (Riteish Deshmukh Raja Shivaji film)

 

Continues below advertisement

विधानपरिषदेतील  माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.  या पत्रात त्यांनी म्हटलं की,  'छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण देशाच्या अस्मितेचा कणा आहे. त्यांनी स्थापन केलेले 'हिंदवी स्वराज्य' हे केवळ राज्यव्यवस्था नसून न्याय, समानता, स्त्रीसुरक्षा, शेतकरी संरक्षण आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित एक आदर्श शासनपद्धती होती. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित अभिनेता रितेश देशमुख लिखित आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट कर मुक्त करण्यात यावा.    आपल्या स्तरावरुन संबंधिताना निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्राद्वारे मी आपणाकडे करीत आहे', असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी या पत्राचे ट्विटही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर  शेअर केले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पहिल्याच निवडणुकीत थलापतींचा मोठा 'विजय'; रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाला राहवेना, लागलीच घरी पोहोचली, Video व्हायरल