Shiv Thakare on Marriage: 'कुणी गडावरुन तर कुणी ड्रममध्ये...मला लग्नच करायचं नाही'; लग्नाबाबत शिव ठाकरेचं स्पष्ट मत, म्हणाला 'नको बाबा...'
Shiv Thakare on Marriage: लग्नाबाबत शिव ठाकरेचं मत काय? अभिनेता लग्न करणार की नाही?

Shiv Thakare said he does not want to Marry: 'बिग बॉस मराठी सिझन 2'चा विजेता शिव ठाकरे आपल्या अभिनेयासाठी ओळखला जातो. त्याने विजेतापद जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. शिव ठाकरेने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. शिव ठाकरे आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. शिव ठाकरे लग्न कधी करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांकडून वारंवार विचारला जातो. अलिकडेच त्याने मुलाखतीत 'मला लग्न करायचं नाही', असं त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं.
शिव ठाकरे लग्न करणार की नाही, अभिनेता थेट बोलला (Shiv Thakare said he does not want to Marry theres too much fear)
अलिकडेच शिव ठाकरेने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने लग्न आणि पूर्वीचं आयुष्य या दोन विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या. सध्या त्याची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुलाखतकाराने शिव ठाकरेला 'मागे वळून पाहताना, नेमकं काय वाटतं? हे करायचं राहून गेलं.. किंवा ही गोष्ट मला करायची आहे, अशी कोणती गोष्ट राहून गेलीये का?', असा प्रश्न विचारला. तेव्हा शिव ठाकरे म्हणाला की, 'आयुष्यात काय करायचं बाकी आहे, असं काहीच नाही...'.
'मी कॉलेज लाईफ जगलो आहे. फॅमिलीसोबत वेळ घालवतोय. मित्रांना भेटतोय. ट्रॅव्हल करतोय, काम करतोय. मला असं वाटत नाही की, कोणती गोष्ट माझ्याकडून राहून गेलीये. जिथे मी आलो आहे, त्यासाठी मी खूप ग्रेटफूल आहे. मला माहित आहे की, या गोष्टी खरंच सोप्या नाहीत. लाखो लोक आहेत, जे इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. मला असं वाटतं की, कुणालाही पहिली पायरी मिळाली, तर त्याला नक्कीच हात द्यावा'.
'जर तो व्यक्ती गेला पुढे, तो पण नक्कीच कुणालातरी मदतीचा हात देईल', असं शिव ठाकरे म्हणाला. 'आता राहिलं काहीच नाही लग्नाशिवाय...', असं म्हणत असताना शिव ठाकरे आणि मुलाखतकार हसतात. 'करायचं नाही ते म्हणजे लग्न आहे. कुणी गडावरुन फेकतंय, कुणी ड्रममध्ये टाकतंय, भाऊ मला लग्नच नाही करायचं. सध्या भीतीचं वातावरण आहे. फक्त मुलीच नाही तर, मुलंही...लग्न म्हणजे काय शुभमंगल सावधान, आयुष्याच्या शेवटपर्यंत खोकल्याचं औषध शेअर करणे. पण इथेच वेगळंच चित्र आहे. रिलेशनशिप वर्कआऊट होत नाहीये. वाईब मॅच होत नाहीये, असं लोक म्हणत आहेत. नको बाबा, मला लग्नच नको', असं शिव ठाकरे म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















