Shilpa Shirodkar Shocked To Hear News Of Her Own Death: 'शिल्पा शिरोडकरची गोळी घालून हत्या...'; स्वतःच्याच मृत्यूची बातमी आली अन् दिग्गज अभिनेत्रीच्या पायाखालची जमिनच हादरली
Shilpa Shirodkar Shocked To Hear News Of Her Own Death: दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी स्वतःच्याच हत्येची बातमी ऐकली. अभिनेत्रीनं स्वतः याबाबत सांगितलं आहे.

Shilpa Shirodkar Shocked To Hear News Of Her Own Death: आपण दिवसभरात अनेक बातम्या ऐकतो... कधी चांगल्या, कधी वाईट, कधी समाज घडवणाऱ्या तर काही राजकीय... पण, फक्त विचार करा की, जर तुमचा मृत्यू झालाय, अशीच बातमी तुमच्याच कानावर आली तर....? गोंधळ उडाला ना? अगदी सुचेनासं झालं? पण, तुम्हाला माहितीय का? असंच काहीसं बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांच्यासोबत झालेलं. स्वतः अभिनेत्रीनं (Actress) याबाबात सांगितलं.
'रघुवीर' चित्रपटाच्या (Raghuveer Movie) शूटिंग दरम्यान बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा (Shilpa Shirodkar) मृत्यू झाल्याची अफवा एकदा पसरली होती. 1995 च्या या चित्रपटात सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्यासोबत शिल्पा शिरोडकर, सुरेश ओबेरॉय, सुधा चंद्रन, मोहनीश बहल, अरुणा इराणी, गुलशन ग्रोव्हर आणि प्रेम चोप्रा हे कलाकार होते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शिल्पाची गोळी घालून हत्या झाल्याची अफवा पसरली होती. अल्पावधीतच ही अफवा थेट अभिनेत्रीच्या घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे अभिनेत्रीच्या घरातले हादरुन गेले होते. पण, त्यानंतर निर्मात्यांनी शिल्पाला याबाबत कल्पना दिली की, सिनेमाचा प्रमोशनल स्टंट आहे.
दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी 'पिंकविला'ला नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना तिनं तिच्यासोबतचा धक्कादायक किस्सा सांगितला. 'पिंकविला'शी बोलताना शिल्पा शिरोडकर यांनी सांगितलं की, "मी कुल्लू मनालीमध्ये होते. त्यावेळी आमच्याकडे मोबाईल फोन नसल्यानं माझे वडील हॉटेलमध्ये फोन करण्याचा प्रयत्न करत होते. मी तिथे सुनील शेट्टीसोबत शूटिंग करत होते. तिथे शूटिंग पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं की, ती शिल्पा आहे की, दुसरं कोणी आहे कारण त्यांना ही बातमी माहित होती."
शिल्पा शिरोडकरच्या हत्येची बातमी आली अन्...
शिल्पा शिरोडकर यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "मी खोलीत परत आलो, तेव्हा सुमारे 20-25 मिस्ड कॉल आले होते. माझे पालक काळजीत होते, कारण वर्तमानपत्रात हेडलाईन होती की, शिल्पा शिरोडकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे."
'तो' सिनेमातला पब्लिसिटी स्टंट होता...
दरम्यान, नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला सांगितलं की, हा एक प्रमोशनल स्टंट होता. शिल्पा शिरोडकर म्हणाल्या की, "जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी 'ठीक आहे' म्हणाले. हो, जे घडलं, ते जरा अतिच होतं. त्यावेळी पीआर स्टंट किंवा असं काहीही नव्हतं. काही माहितीच नव्हतं, हे काय असतं? असं काहीतरी होणार आहे, हे मला कळणारी मी शेवटची व्यक्ती होते. त्यावेळी कोणीही परवानगी घेतली नाही. चित्रपट चांगला चालला, म्हणून मी फार रागावली नाही."
'जटाधारा'मध्ये दिसणार शिल्पा शिरोडकर
शिल्पा शिरोडकर आता 'जटाधारा'मध्ये दिसून येणार आहेत, जी एक पॅन इंडिया थ्रिलर फिल्म आहे, ज्यामुळे शिल्पा शिरोडकर बऱ्याच काळानं सिल्वर स्क्रिनवर परतणार आहेत. 'जटाधारा' एक थ्रिलर फिल्म आहे. जी रहस्यमय अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणइ त्यांच्या रहस्यमयी विद्यांवर आधारित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























