Shilpa Shetty Raj Kundra met Premanand Maharaj : बॉलिवूडची लोकप्रिया अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ईश्वरावर शिल्पाला खूप विश्वास आहे आणि तिच्या पोस्टमधून हे नेहमीच दिसून येतं. अलीकडेच ती पती राज कुंद्रासह  प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला पोहोचली. भेटीदरम्यान वातावरण शांत आणि आध्यात्मिक होतं, पण राज कुंद्राच्या एका वक्तव्याने सगळेच थक्क झाले.

प्रेमानंद महाराजांना अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री फॉलो करतात, पण आता या यादीत शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांचंही नाव समाविष्ट झालं आहे. दोघं वृंदावनला गेले आणि त्यांनी जीवन जगण्याची कला आणि मार्गदर्शन घेतलं. त्यांनी हात जोडून प्रेमानंद महाराजांचे विचार ऐकले आणि आपल्या मनातील गोष्टी मांडल्या.

शिल्पा शेट्टीने विचारला 'हा' प्रश्न

शिल्पा शेट्टीने महाराजांकडून जपा कसा करावा? याबाबतची माहिती घेतली आणि विचारलं – “राधा जप कसा करावा?” त्यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की, राधा जप सर्व कष्टांपासून मुक्त करतो. संतांचे वचन मानून जर चाललो तर आयुष्य सुखकर होईल. त्यानंतर राज कुंद्रानेही आपली इच्छा व्यक्त केली.

गप्पांच्या दरम्यान महाराजांनी सांगितलं की, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून ते खराब किडन्यांसह जगत आहेत. ते म्हणाले, “कधीही देवाचा निरोप येऊ शकतो आणि आता मला याची अजिबात भीती वाटत नाही.” हे ऐकल्यावर राज कुंद्राने तात्काळ आपली भावना व्यक्त केली.

“माझी एक किडनी तुमच्या नावे” – राज कुंद्रा

राज कुंद्रा म्हणाले, “मी गेल्या 2 वर्षांपासून तुम्हाला फॉलो करत आहे. माझ्याकडे काही प्रश्न नाहीत. तुम्ही इतके लोकप्रिय आहात की मनात एखादा प्रश्न किंवा भीती आली, तर तुमच्या व्हिडिओतून दुसऱ्या दिवशीच उत्तर मिळतं. तुम्ही सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहात. मला तुमची वेदना माहीत आहे. मी जर तुमच्या उपयोगी पडलो, तर माझी एक किडनी तुम्हाला देईल.”

ऑफर ऐकून प्रेमानंद महाराजांचं उत्तर

हे ऐकून तिथे उपस्थित लोक तर थक्क झालेच, पण शिल्पाही काही क्षणांसाठी अवाक झाली. राज कुंद्राच्या या विधानाकडे प्रेमानंद महाराजांनी प्रेम आणि सन्मानाच्या भावनेने पाहिलं आणि म्हणाले, “नाही… माझ्यासाठी एवढंच खूप आहे की तुम्ही आनंदी राहा. जोपर्यंत देवाचा निरोप येत नाही, तोपर्यंत किडनीच्या कारणाने आम्ही जग सोडणार नाही. आणि खरं सांगायचं तर, निरोप आला की जावंच लागतं. पण तुमची ही सद्भावना आम्ही मनापासून स्वीकारतो.”

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta: 'अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी...', पाठमोरी बसलेली हिरोईन अन् तिनं विचारलेला 'तो' प्रश्न; भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता'मधली प्रेमकहाणी

Shilpa Shirodkar Car Accident: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा अपघात; बसची गाडीला जोरदार धडक, नेमकं काय घडलं?